Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Tower Rush: Il Gioco da Casinò Online Velocissimo Che Ti Mette sulla Sedia

August 14, 2026

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » ऊस उत्पदकांसाठी महत्वाची बातमी : ऊसपिकाच्या नोंदी आता मोबाईल ऍपद्वारे होणार
ताज्या बातम्या

ऊस उत्पदकांसाठी महत्वाची बातमी : ऊसपिकाच्या नोंदी आता मोबाईल ऍपद्वारे होणार

Neha SharmaBy Neha SharmaJuly 15, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

राज्यातील साखर कारखान्यांच्या शेती विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱयांनी शेतकऱयांना ई-पीक पाहणी ऍप वापराकरिता माहिती व प्रशिक्षणाची कार्यवाही करून शेतकऱयांनी स्वतः गाव नमुना नंबर 12 (सातबारा) मध्ये लागवड झालेल्या ऊसपिकाच्या नोंदी ई-पीक पाहणी ऍपद्वारे कराव्यात, अशा सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी साखर कारखान्यांना दिल्या आहेत.

साखर आयुक्तालयाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, महसूल व वन विभागाच्या पीक पाहणी प्रकल्पाची सर्व ऊस उत्पादक शेतकऱयांनी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने 30 जुलै 2021 च्या शासन निर्णयान्वये ई-पीक पाहणी प्रकल्प 15 ऑगस्ट 2021 पासून राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शासननिर्णयानुसार गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सनियंत्रण समितीच्या 20 ऑगस्ट 2021 रोजीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार साखर कारखान्याच्या शेती विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकऱयांना ई-पीक पाहणी ऍप वापराकरिता माहिती व प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावयाची आहे. शेतकऱयांनी स्वतः गावनमुना नंबर 12 (सातबारा) मध्ये पेरणी-लागवड झालेल्या पिकांच्या नोंदी मोबाईलवरील ई-पीक पाहणी ऍपद्वारे करावयाच्या आहेत.

सर्व साखर कारखान्यांनी मोहीम स्वरूपात आपल्या कारखान्याकडे नोंद झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱयांकडून ई-पीक पाहणी ऍपद्वारे गाव नमुना नंबर 12 (सातबारा) मध्ये ऊसपिकाच्या नोंदी करून घ्याव्यात. असे केल्याने अचूक ऊसपीक क्षेत्राचा अंदाज करता येईल. कारखान्यांनाही नक्की किती ऊसगाळपासाठी उपलब्ध होईल, याची अचूक माहिती मिळेल. या ऍपच्या माध्यमातून ऊसनोंदणीची कार्यवाही सुलभतेने होण्यास सर्व कारखान्यांना यापुढे मदत होणार आहे.
कारखान्यांना ऊसनोंदणीकरिता लागणाऱया मनुष्यबळातदेखील यामुळे कपात होऊ शकेल. सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालक व खासगी साखर कारखान्यांचे जनरल मॅनेजर यांनी सर्व ऊसउत्पादक शेतकरी ई-पीक पाहणी ऍपमध्ये ऊसपिकाच्या नोंद घेतील. याकरिता शेती विभागाच्या कर्मचारी, अधिकाऱयांना नियोजनबद्ध कार्यक्रम आखून द्यावा. साखर कारखान्यांच्या शेती विभागामार्फत उसाच्या नोंदी ई-पीक पाहणी ऍपद्वारे करण्यासाठी शेतकऱयांना कारखानास्तरावर व कारखान्याच्या गटऑफिस स्तरावर अँड्रॉइड मोबाईल ऍप सुविधा उपलब्ध करून द्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

🔹गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी नोंदी घ्या : साखर कारखान्याकडे नोंद झालेल्या कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱयांच्या ऊसपिकाची नोंद ई-पीक पाहणी ऍपमध्ये करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी महसूल विभागाचे तलाठी तसेच कृषी विभागाचे कृषी सहायकांचे सहकार्य घ्यावे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांशी संपर्क करावा. 2022-23चा गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व शेतकऱयांच्या ऊसपिकाच्या नोंदी गावनमुना नंबर 12 (सातबारा) मध्ये घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिल्या आहेत

सोर्स : agrowon

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Tower Rush: Il Gioco da Casinò Online Velocissimo Che Ti Mette sulla Sedia

August 14, 2026

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Tower Rush: Il Gioco da Casinò Online Velocissimo Che Ti Mette sulla Sedia

ताज्या बातम्या August 14, 2026

1. Cosa Rende Tower Rush un’Esperienza Casinò a Colpo RapidoNel mondo del gioco d’azzardo online,…

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.