उन्हाची तीव्रता वाढण्यासोबतच लिंबूला देखील मागणी वाढली आहे. त्याच्याच परिणामी कळमना बाजार समिती  फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अवघ्या २५०० ते २७०० रुपये क्‍विंटल याप्रमाणे व्यवहार होणाऱ्या लिंबाचे दर  मार्च महिन्यात १० ते ११ हजार रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. यापुढील काळात तापमानात वाढ झाल्यास या दरात आणखी सुधारणा होईल, अशी शक्‍यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.