Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

August 7, 2026

Royal Reels 7 Casino: Quick‑Hit Slots, Rapid Roulette, and the Fast‑Track Gaming Experience

August 7, 2026

WinGaga Online Casino: Rychlý toč, Velké výhry – Průvodce krátkou relací

August 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’
हवामान

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’

Neha SharmaBy Neha SharmaApril 27, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

राज्यात उन्हाचा (Heat) चटका पुन्हा वाढू लागला आहे. अकोला, सोलापूर मध्ये पारा चाळीशीपार गेला आहे. यातच मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिट (Hailstorm) झाली आहे.

आज (ता. २७) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाबरोबरच गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ (Hailstorm Orange Alert) देण्यात आला आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा शक्यता कायम हवामान विभागाने वर्तविली आहे. Weather Forecast

पश्चिम विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. पश्चिम विदर्भापासून, उत्तर अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे. नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंची दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे.

मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावल्यानंतर आज (ता. २७) मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात गारपीट आणि वादळी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. Hailstorm

 

 

राज्यात कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. उन्हाचा चटका आणि उकाडाही कायम आहे. बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४०.३ अंश सेल्सिअस तर सोलापूर येथे ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कोकण वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३९ अंशांच्या दरम्यान आहे. कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. Weather Update

बुधवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३८.३ (२२.२), नगर ३८.४ (२९.०), जळगाव ४०.५ (२५.२), कोल्हापूर ३६.५ (२२.६), महाबळेश्वर ३१.२ (१६.४), नाशिक ३७.८(२२.४),

निफाड ३९.५(२२.५), सांगली ३७.६ (२२.३), सातारा ३७.६ (१९.५), सोलापूर ४०.० (२४.०), सांताक्रूझ ३३.० (२७.०), डहाणू ३४.२ (२५.५), रत्नागिरी ३२.५ (२४.३),

छत्रपती संभाजीनगर ३८.२ (२१.०), नांदेड ३६.८ (२०.४), परभणी ३७.३ (२२.८), अकोला ४०.३ (२२.०), अमरावती ३६.८(२०.३), बुलढाणा ३७.० (२२.०), ब्रह्मपूरी ३७.४ (२३.१),

चंद्रपूर ३२.८ (२०.४), गडचिरोली ३४.४(२२.८), गोंदिया ३६.५ (२१.७), नागपूर ३५.४ (२१.५), वर्धा ३८.०(२१.९), यवतमाळ ३८.० (१९.०).

  • हे पण वाचा : IMD Weather Update : एप्रिल अखेरपर्यंत पावसाचा अंदाज, राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता

वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

नाशिक, नगर, पुणे, परभणी, हिंगोली, नांदेड.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी,

मध्य महाराष्ट्र, : नंदूरबार, धुळे, जळगाव, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर.

विदर्भ : बुलढाणा, अमरावती, वाशीम, अकोला, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Unseasonal Rain : बेमौसम बारिश से ग्रीष्मकालीन फसलों को नुकसान।

April 11, 2024

Unseasonal Rain Alert : विदर्भ, मराठवाड़ा में बारिश, ओलावृष्टि की चेतावनी

April 11, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

ताज्या बातम्या August 7, 2026

Jump straight into the pulse of quick, high‑intensity gaming at https://uuspin-official-au.com/, where every spin feels…

Royal Reels 7 Casino: Quick‑Hit Slots, Rapid Roulette, and the Fast‑Track Gaming Experience

August 7, 2026

WinGaga Online Casino: Rychlý toč, Velké výhry – Průvodce krátkou relací

August 7, 2026

Vulkan Casino: Rychlé výhry a vysoká intenzita hraní na automatech

August 7, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.