Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Пин Ап Казино Официальный Сайт – Играть в Онлайн Казино Pin Up

September 29, 2026

Pin Up Casino – Azərbaycanda Onlayn Kazino – Qeydiyyat və Giriş

September 29, 2026

Pinco Online Kazino (Пинко) Azərbaycanda – Etibarlı Lisenziyalar və Sertifikatlar

September 29, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » मोगरा लागवड
ताज्या बातम्या

मोगरा लागवड

Neha SharmaBy Neha SharmaJanuary 21, 2023Updated:January 21, 2023No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
जमीन : मोगरा जरी सर्व प्रकारच्या जमिनीत येत असला तरी मोगऱ्याला मध्यम खोलीची (३ फूट) व भुरकत रंगाची, चुनखडी नसलेली जमीन (५ टक्क्यांपेक्षा कमी) योग्य ठरते. जमिनी चांगली निचरा होणारी असावी. निचरा न झाल्यास मोगऱ्याची पाने पावसाळ्यात विशिष्ट पिवळी पडतात. तरी वरील जमीन मोगऱ्यासाठी योग्य समजावी
पुर्वमशागत : जमीन डिसेंबर – जानेवारी महिन्यामध्ये २५ ते ३० सेंमी खोल नांगरून घ्यावी. २ – ३ फुळवाच्या पाळ्या घालून सपाट करावी. नंतर ५ x ५ फुट अंतरावर १ x १ x १ फुट आकारचे खड्डे खोडून घ्यावेत.
खड्डा कसा भरावा : खड्डा भरताना प्रथम तळाशी वाळलेले गवत. काडी कचरा सहा इंच उंचीपर्यंत भरावा व नंतर एक घमेले पुर्ण कुजलेले शेणखत किंवा एक ओंजळभर गांडूळ खत व कल्पतरू १०० ग्रॅम टाकून मातीने खड्डा भरून घ्यावा.

हवामान :
मोगरा साधारणत : स्वच्छ हवामानात चांगल्या प्रकारे येतो. अतिशय थंडी चालत नाही. मोगऱ्याची चांगली वाढ होण्यास २५ डी. ते ३५ डी. से. तापमान योग्य ठरते. अशा हवामानात कळ्या भरपूर लागून उत्पन्न वाढते.
मोगऱ्याच्या जाती : 
१) मोतीचा बेला : कळी गोलाकार असते आणि फुलात दुहेरी पाकळ्या गोलाकार असतात.
२) बेला : या मोगऱ्याच्या जातीला तामिळ भोषेत ‘गुडूमल्ली’ म्हणतात. फुलाता दुहेरी पाकळ्या असतात पण लांब नसतात.
३) हजरा बेला: कानडी भाषेत ‘सुजीमल्लीरो’ म्हणतात. फुलात एकेरी पाकळ्या असतात.
४) मुंग्ना : तामिळ भाषेत ‘अड्डुकुमल्ली’ व कानडीत ‘एलुसूत्ते मल्लरी’ म्हणतात. कळ्या आकाराने मोठ्या (२.५ सेमी व्यास) असतात. फुलात अनेक गोलाकार पाकळ्या असतात.
५) शेतकरी मोगरा : (एक कळीचा मोगरा) ह्या मोगऱ्याला चांगल्या प्रतीच्या काळ्या येत असून हार व गजरे याकरीता वापरला जातो.
६) बट मोगरा : (डबल पाकळीचा) ह्या मोगऱ्याच्या कळ्या आखुड असून कळ्या चांगल्या टणक फुगतात.
बट (मोती) मोगरा व शेतकरी मोगरा तुलना : बट (मोती) मोगऱ्याच्या पाकळ्या घट्ट, टणक व जाड असतात. पाकळी ही कमळासारखी एकावर एक घट्ट असते. त्याला आकर्षक चमक व मंद, दिर्घकाळ दरवळणारा सुगंध असतो. काढणीस जरी उशीर झाला. तरी पाकळ्या भरपूर व फुल घट्ट असल्याने टिकाऊपणा वाढतो.
शेतकरी मोगऱ्यामध्ये मात्र असे नसते, ह्याला ५ पाकळ्या असून त्या लांबट जाई, कुंड्यासारख्या पातळ असून काढणीस उशीर किंवा काढणीनंतर विक्रीस उशीर झाला तर पाकळ्या लुज पडून निस्तेज दिसतात. कळी नाजूक आणि मऊ असून उष्णतेने जांभळी लाल ते करड्या रंगाची होते. कळ्या काढल्यानंतर लगेच उमलतात. देठ नाजूक असतो. हारामध्ये निट ओवला जाता नाही.
बट मोगऱ्याचा गजर आकर्षक होतो. मोती मोगऱ्याचे झुडूप आकर्षक राहते. त्याला पाने पोपटी व गोलाकार असतात. पण थोडे पोपटी मऊ व डल असते. पंजे लांब नसतात.
याउलट शेतकरी मोगऱ्याची आकर्षक, चमकदार शेंड्याला लांबट गोल, हिरवीगार दिसायला मऊ , पण हात लावल्यास कडक असतात. फुट वेलीसारखी असते. मोगरा हा काटक असल्याने यावर ऊन किंवा थंडीचा प्रादुर्भाव होत नाही. तरीपण शेतकरी मोगऱ्यापेक्षा मोती मोगर हा जास्त काटक व एकाच जागी गुच्छाच्या स्वरूपात फुले लागतात. कळ्या वजनदार असल्याने तोडणीस सोपे, वाया न जाणारी असल्याने तोडणीचा खर्च कमी व भाव अधिक असतो. विदर्भ, मराठवाडा, राजस्थान, बिहार, कर्नाटक, तमिळनाडू, दिल्ली, हरियाना अशा थंड व उष्ण विषम हवामानामध्ये या मोगऱ्याच्या पिकाच्या लागवडीस फार मोठा वाव आहे.
मोगरा लागवडीचा काळ : मोगऱ्याची लागवड जूनचा पहिला पाऊस पडून गेल्यानंतर करावी. मोगऱ्याची लागवड शक्यतो पिशवीतील रोपे लावून करावी. त्यामुळे दीड ते दोन महिने रोपे नर्सरीत वाढतात व मर टळली जाणे.
मोगरा कसा लावावा : निर्यात करू इच्छिणाऱ्या बागाईतदरांनी नर्सरीमधील विविध जातींपैकी योग्य रोपे आणून लागवड करावी. रोपे लावताना पिशवी दोन्ही बाजूला ब्लेडने कापून (मुळांना इजा न होता) काढावी. नंतर हुंडीच्या आकाराची माती खड्ड्याच्या मधोमध काढून रोप लावावे. रोपाचे खोड वर राहील याची काळजी घ्यावी. नंतर शेजारील माती रोपाला लावून हलके पायांनी दाबून घ्यावे. यामुळे जमिनीत पोकळी राहत नसून झाड न कोलमडता सरळ वाढते.
रोपे लावल्यानंतर जर्मिनेटर १ लिटर व पाणी १०० लिटर यांचे द्रावण तयार करून प्रत्येक रोपाच्या शेंड्यावरून बुंध्यावर १०० मिली ओतावे. म्हणजे मुळांचा जारवा चांगला वाढून फुट वाढते. मर होत (नांग्या पडत) नाही.
लागवडीनंतर जून ते डिसेंबरपर्यंत घ्यावयाची काळजी: रोपांची झपाट्याने वाढ होण्यासाठी प्रत्येक झाडास १० ते १५ ग्रॅम मिश्रखत द्यावे. रोगमुक्त फुट जारवा वाढणे व फुले चांगल्या प्रकारे लागण्यासाठी प्रत्येक झाडास २५ ग्रॅम मिश्रखताचा वापर दर महिन्यास करावा. पुढे दिल्याप्रमाणे फवारण्या केल्यास मोगऱ्याला कळ्याचे प्रमाण वाढते. जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट,प्रिझम, न्युट्राटोन हार्मोनीचा वापर दर महिन्याला पुढे दिलेल्या प्रमाणात करावा.
नवीन लागवडीच्या झाडांची जोमदार वाढ होण्यासाठी सप्तामृत, होर्मोनी फवारणीचे वेळापत्रक :
१) पहिली फवारणी :लागवड केल्यानंतर १ महिन्याने (जुलै – ऑगस्टमध्ये) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम २५ ० मिली. + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.
२) दुसरी फवारणी : लागवडीनंतर २ महिन्यांनी (सप्टेंबरमध्ये) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर ३५० मिली. + क्रॉंपशाईनर ३५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + न्युट्राटोन १०० मिली. + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.
३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ३ महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये ) :जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ६०० मिली.+ क्रॉंपशाईनर ६०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.
४) चौथी फवारणी : लागवडीनंतर ४ महिन्यांनी (नोव्हेंबरमध्ये) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ६०० मिली.+ क्रॉंपशाईनर ६०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.
झाडांना ताण देणे : झाडांना ताण देताना आपण पाणी देणे थांबवतो. शक्यतो डिसेंबरमध्ये खांदणी करून जानेवारीमध्ये शेणखत व पाणी द्यावे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कळ्या लागण्यास सुरुवात होते. एकूण ४ ते ५ महिने (फेब्रुवारी ते जून) फुलांचा बहर असतो. खते देताना साधारणत: १० किलो कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम मिश्रखत आणि २५० ते ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत (झाडाच्या वयोमानानुसार) द्यावे व हलकेसे पाणी द्यावे.
छाटणी केल्यानंतर फुटीसाठी जानेवारीमध्ये : 
जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी १०० मिली. + १०० लि.पाणी.
फुट वाढून कळ्या लागण्यासाठी वरील फवारणीनंतर १५ दिवसांनी : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ३५० ग्रॅम + प्रिझम ३५० मिली. + हार्मोनी २०० ते २५० मिली. + १५० लि.पाणी.
तोडे चालू झाल्यानंतर दर १५ ते ३० दिवसांनी : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन ५०० मिली + हार्मोनी ३०० मिली. + २०० लि.पाणी.
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Пин Ап Казино Официальный Сайт – Играть в Онлайн Казино Pin Up

September 29, 2026

Pin Up Casino – Azərbaycanda Onlayn Kazino – Qeydiyyat və Giriş

September 29, 2026

Pinco Online Kazino (Пинко) Azərbaycanda – Etibarlı Lisenziyalar və Sertifikatlar

September 29, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Пин Ап Казино Официальный Сайт – Играть в Онлайн Казино Pin Up

ताज्या बातम्या September 29, 2026

Пин Ап Казино Официальный Сайт – Играть в Онлайн Казино Pin Up ▶️ ИГРАТЬ Содержимое…

Pin Up Casino – Azərbaycanda Onlayn Kazino – Qeydiyyat və Giriş

September 29, 2026

Pinco Online Kazino (Пинко) Azərbaycanda – Etibarlı Lisenziyalar və Sertifikatlar

September 29, 2026

Mostbet Casino PT – Login no Casino Most Bet Portugal

September 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.