Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino

June 26, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » उन्हाळी – हिवाळी (रबी) सोयाबीन लागवड वास्तविकता
ताज्या बातम्या

उन्हाळी – हिवाळी (रबी) सोयाबीन लागवड वास्तविकता

Neha SharmaBy Neha SharmaOctober 1, 2022Updated:October 1, 2022No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये सोयाबीन पीक घ्यावे की नाही घ्यावे नेमके केव्हा घ्यावे कसे नियोजन असावे याबद्दल सविस्तर विश्लेषण
👉🏻 बऱ्याच शेतकऱ्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत # व शेतकरी वर्गाला पडलेला प्रश्न म्हणजे रबी व उन्हाळी हंगामात सोयाबीन घ्यावे की नाही ? त्यामध्ये प्रामुख्याने बरेच लोक सोयाबीन हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात येते असे वक्तव्य करतात व असे अनेक व्हिडिओ सुद्धा युट्यूबला उपलब्ध आहेत. कोणाचा हेतू काय असेल माहीत नाही सोयाबीन हिवाळ्यात येते की नाही येत हे महत्वाचे आहे, आणि त्यापेक्षाही ते हिवाळ्यात घ्यावे की नाही घ्यावे हे जास्त महत्त्वाचं आहे # किंवा घ्यायचेच असेल तर केव्हा पेरणी केली पाहिजे, आणि कोणते वाण वापरले पाहिजेत, याविषयी सर्व शेतकरी संभ्रमात आहेत त्यांच्यासाठीच हा लेख
👉🏻
सोयाबीन हे प्रामुख्याने उष्ण व आद्रयुक्त हवामानामध्ये, तसेच १८ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानात येणारे पीक आहे, थंड व कोरड्या हवामानाचा सोयाबीन पिकाच्या वाढीवर व फुल धारणेवर अनिष्ट परिणाम होतो त्यामुळे हीवाळ्यामध्ये सोयाबीन पिकाची वाढ होत नाही व फुलधरणा सुध्दा होत नाही.
👉🏻
मुद्दा १. सोयाबीन हे शॉर्ट डे प्लांट आहे, त्यामुळे सोयाबीन पिकला फोटोपिरेड हा कमी लागतो व त्याला अनुकूल तापमान आवश्यक असते ( २५-३० अंश सेल्सिअस). हिवाळ्यात फोटोपिरेड जास्त असतो ( Active Sunlight Hours) व तापमान कमी असते याचा परिणाम सोयाबीन वर असा होतो की त्यामुळे सोयाबीन पिकला फोटोपिरेड जास्त भेटतो व त्यामुळे पूनृत्पादक वाढ ( Reproductive growth) थांबते व याचा झाडाच्या वाढीवर व फुलधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला काही ठिकाणी गुच्छ / झूडप यांसारखे सोयाबीन चे झाडे आढळून येतात. त्यामुळे शास्त्रीय दृष्टया हिवाळी / रब्बी हंगामात सोयाबीन लागवडीची शिफारस करता येत नाही.
👉🏻
मुद्दा २. शिफाशीप्रमाणे सोयाबीन हे खरीप हंगामात घेतले जाणारे पीक आहे, जर बियाणे तुटवडा असेल तर उन्हाळी हंगामात म्हणजे ( late Rabi ) मध्ये घेतल्या जाते ; प्रामुख्याने उन्हाळी सोयाबीन हे बियाणे तुटवडा असल्यामुळे घेतल्या जाते परंतु मागील वर्षी काही ठिकाणी चांगले उत्पादन आले आहे परंतु बरेच म्हणजे जवळपास ७५-८० टक्के ठिकाणी उन्हाळी सोयाबीन चे उत्पादन अतिशय कमी मिळाले आहे, उन्हाळी सोयाबीन येते परंतू त्यासाठी आपल्याला योग्य नियोजन करावे लागेल व उन्हाळी सोयाबीन हे फक्त आणि फक्त बियाणे उत्पादन म्हणूनच शक्य आहे, आर्थिक लाभ घेण्यासाठी माझ्या मते उन्हाळी सोयाबीन हे पेरणे टाळणे योग्य त्याऐवजी आपण कांदा/ मका/ सूर्यफुल असे पिके घेऊ शकतो.
👉🏻
उन्हाळी म्हणजे ( late Rabi) सोयाबिन आपण पेरू शकतो म्हणजे २५ डिसेंबर ते १५- २० जानेवारी पर्यंत ( त्यापेक्षा उशिरा नाही ) ( ५-१५ जानेवारी चांगली वेळी ) .
👉🏻
मुद्दा ३. जरी सोयाबीन हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात लावले तरी त्याला पाहिजे इतके उत्पादन मिळणार नाही हे मात्र नक्की आहे ; त्याऐवजी हिवाळी पिके हरबरा # गहू # वाटाणा # मका # कांदा यांची लागवड केली तर जास्त उत्पन्न मिळू शकते ; त्यामुळे हिवाळी सोयाबीन लागवड करणे टाळावे.
👉🏻 डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी मध्ये जर जास्त थंडी पडली तर सोयाबीनची वाढ होणार नाही व फुले लागणार नाहीत आणि शेंगा व्यवस्थित भरणार नाहीत त्यामुळे उत्पादन कमी येईल # परंतु जर थंडी पडली नाही तर उत्पादनावर तेव्हडा परिणाम होणार नाही # थंडी पडेल नाही पडेल हे निसर्गावर अवलंबून आहे त्यामुळे काही ठिकाणी हिवाळी सोयाबीन येऊ शकते. परंतु त्याचा विचार करणे आपल्याला परवडणार नाही.
👉🏻 उन्हाळी सोयाबीन लावयचीच असेल तर जानेवारी मध्ये लावा # लागवडी साठी लवकर येणारे किंवा मध्यम कालावधीत येणारे वाण JS-९३०५, RVS-१८, JS-३३५, Phule Kimya किंवा PKV-१००३९ किंवा फुले दुर्वा किंवा MAUS ६१२ यापैकी व मागील वर्षीच्या शेतकरी अनुभवानुसार वाण निवडावेत.
👉🏻लागवड करताना अंतर कमी ठेवले तरी चालेल ( खरीप च्या तुलनेत ). ४५ x ७-१० सेमी याप्रमाणे अंतर ठेवून बियाण्याचे प्रमाण थोडे जास्त वापरावे लागेल (२५ किलो एकरी ).
लवकर येणारे वाण असेल तर ३८x १० सेमी अंतर ठेवू शकता
👉🏻 उन्हाळी सोयाबीन लागवड करत असताना आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे का हे बघणे आवश्यक आहे, त्याच बरोबर आपल्याला दुसरे एखादे प पर्यायी पीक घेता येईल का ( भाजीपाला पिके उन्हाळी पिके ) कारण उन्हाळी सोयाबीन चे उत्पादन कमी मिळते व पाणी खूप जास्त प्रमाणात द्यावे लागते त्यामुळे आपण दुसरे पिक घेणे योग्य ठरेल
👉🏻 पाणी देण्यासाठी पाट पाणी किंवा ड्रीप ची व्यवस्था असावी तसेच sprinkler चा वापर टाळावा कारण त्यामुळे Microclimate तयार होऊन सोयाबीन ची अतोनात वाढ होते व सोयाबीनला फुले लागत नाहीत व त्यामुळे उत्पादन मिळत नाही, शक्यतो पाट पाणी द्यावे.
👉🏻 शेतकरी मित्रांना महत्वाचा सल्ला असेल शक्यतो उन्हाळी व हिवाळी सोयाबीन घेणे टाळावे, जर करायचीच असेल तर पेरणी करताना काळजी घ्यावी की खरिफ हंगामात त्या शेतात आपण दुसरे पिक घेणे आवश्यक आहे, उन्हाळी सोयाबीन नंतर लगेच खरिप सोयाबीन घेणे टाळावे.
👉🏻 या वर्षीचा अनुभव बघितला तर खूप ठिकाणी Yellow Mosaic Virus तसेच कॉलर रॉट तसेच सोयाबीन पिवळी पडणे असे अनेक रोग दिसून आले आहेत, यामागे उन्हाळी सोयाबीन हा खूप मोठा फॅक्टर आहे त्यामुळे उन्हाळी किंवा रबी हंगामातील सोयाबीन लागवड हे भविष्यकाळात सोयाबीन शेतीवर परिणामकारक ठरू शकते त्यामुळे शक्यतो लागवड करणे टाळावी.
👉🏻 मागील वर्षी बरेच ठिकाणी शेतकरी मित्रांना अतिशय कमी उत्पादन मिळाले आहे, काहींचा खर्च सुध्दा निघाला नाही व उन्हाळी सोयाबीन खूप उशिरा परिपक्व झाल्याने पुढील हंगामतील नियोजन सुध्दा विस्कळीत झाले , पीक निघाले की नांगरट झाली की जमीन वाळणे सुध्दा गरजेचे आहे आणि तेव्हडा वेळ मिळणे आवश्यक आहे त्यामुळे वरील सर्व गोष्टी विचारात घेऊन आपण उन्हाळी – हिवाळी सोयाबीन लागवड करण्याचा विचार करावा.

वरील माहिती ही शास्त्रीय व अनुभव यानासुर लिहिली आहे. शेतकरी वर्गात असलेल्या हिवाळी व उन्हाळी सोयाबीन लागवडीचा संभ्रम दूर करण्यासाठी हा लेख लिहिला आहे.
धन्यवाद🙏🏻🙏🏻🌱
डॉ. अनंत उत्तमराव इंगळे
Ph.D. Genetic and Plant Breeding🌱MPKV Rahuri.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino

June 26, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino

ताज्या बातम्या June 26, 2026

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino ▶️ ИГРАТЬ Содержимое Преимущества игры в…

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.