Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

SG Casino: Ganancias Rápidas y Juego de Slots de Alta Intensidad

August 11, 2026

HugoBets Casino:s ikonografi hyllas av svensk designer

August 9, 2026

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

August 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » बदलत्या वातावरणाचा गुलाब उत्पादकांना फटका
कृषी-चर्चा

बदलत्या वातावरणाचा गुलाब उत्पादकांना फटका

Neha SharmaBy Neha SharmaDecember 16, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

ढगाळ वातावरणाचा गुलाबाच्या फुलांना मोठा फटका बसत आहे. वातावरणामुळं गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतोय.

बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना  मोठा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात कधी थंडीचा कडाका तर कधी ढगाळ वातावरण आहे. तर कुठे अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. सध्या असलेल्या ढगाळ वातावरणाचा गुलाबाच्या फुलांना  मोठा फटका बसत आहे. वातावरणामुळं गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतोय. त्यामुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

ढगाळ वातावरणामुळं हिंगोली जिल्ह्यातील गुलाब उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण गुलाबावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दुसरीकडं दमट वातावरणामुळं अचानक गुलाबाच्या उत्पादन चार पटीनं वाढ झाली आहे. यामुळं बाजारात मोठ्या प्रमाणावर गुलाबाच्या फुलांची आवक सुरु झाली आहे. याचा परिणाम बाजार भावावर होत आहे. सध्या गुलाबाचे दर घसरले आहेत.

रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानं पुढील बहरात गुलाबाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटणार

हिंगोली जिल्ह्यातील धानोरा येथील गुलाब शेतीचे उत्पादन घेणारे शेतकरी पांडुरंग राऊत यांनी त्यांच्या शेतात दोन एकर शेत जमिनीवर चार वर्षापूर्वी गुलाबाची लागवड केली आहे. गुलाबाची झाडे मोठी झाल्यानं गुलबाच्या फुलांचे चांगले उत्पन्न देखील त्यांना मिळत आहे. परंतू, मागील आठ दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणानं या गुलाब फुल शेतीला मोठा फटका बसत आहे. दमट वातावरणामुळे अचानक गुलाबाच्या फुलांचे उत्पादन वाढले आहे तर दुसीरकडं बाजारात फुलांची आवक वाढल्यानं फुलांचे भाव घसरले आहेत. अशातच ढगाळ वातावरणामुळं तयार असलेल्या गुलाबाच्या कळ्यांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. गुलाबावर करपा रोगाचा, किड्यांचा प्रादुर्भाव  झाला आहे. यामुळं गुलाबाच्या पुढील बहरात उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटणार आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

राज्यात सातत्यानं बदल होत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी तर अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. दरम्यान आजपासून पुढील तीन दिवस हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमधील बिकानेर, चुरू झुंजनू, हनुमानगड जिल्ह्यात वातावरणात बदल झाला असून, तिथे थंडीची लाट येण्याची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे पुढच्या तीन दिवसांनतर म्हणजे सोमवारपासून (19 डिसेंबरपासून) महाराष्ट्रासह गुजरातमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Onion News : गिरेंगे प्याज के दाम? सरकार खरीदेगी 5 लाख टन प्याज।

March 30, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

Giloy benefits : स्वस्थ के लिये प्रभावी गिलोय

March 19, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

SG Casino: Ganancias Rápidas y Juego de Slots de Alta Intensidad

ताज्या बातम्या August 11, 2026

Cuando el teléfono suena y deseas una emoción ultrarrápida, SG Casino es el lugar para…

HugoBets Casino:s ikonografi hyllas av svensk designer

August 9, 2026

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

August 9, 2026

Is de Zumospin Casino App Veilig om te Installeren in Nederland

August 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.