अहमदनगर जिह्यातील देवळाली प्रवरा येथील सौरभ कदम व प्रसाद देशमुख यांनी एकत्र येत कृषी अवजारे यंत्रनिर्मिती सुरु केली आहे. सुमारे सात वर्षांपासूनचे अथक प्रयत्न, तांत्रिक,कौशल्य व कल्पनाशक्ती यांचा वापर करून त्यांनी आधुनिक बहुउद्देशीय टोकन यंत्र विकसित केले आहे.
‘एस. पी. अग्रो’ इनोव्हेशन याची निमिती करून सुरुवात्च्या काळात स्वताला आणि गटातील शेतकार्यांना भेडसवणारया अडचणीवर काम सुरु केले कांदा लागवडीसाठी आवश्यक असणार्या रोपवाटिका करण्यासाठी येणाऱ्या अडचणी शोधून कांदा बी पेरणीचे मानव चालीत यंत्र बनविले गटातील शेतकरी मित्र सोबत यंत्राचा यशस्वी प्रयोग झाला या उपक्रमाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड केल्या नंतर अनेक शेतकरी बांधवानी चागला प्रतिसाद दिला आपण यशस्वी पद्धतीने मशीन बनवून आपण वापरू शकतो हे वाढणाऱ्या मशिनच्या मागणीचे सिद्ध केले.
कांदा लागवडीच्या काळात सगळ्यांच शेतकरयाना मजूर समस्येला सामोरे जावे लागत होते. मजूर मिळाले तरी योग्य आणि वेळेत ण होणारी ल्गावाद यामुळे शेतकर्यांची खूप कोंडी होत असे व हि अडचण सर्वच भागातील शेक्र्याना होती आणि आहे हे ओळखून टीमने प्लाटोमेटने हे कांदा लागवड यंत्र बनवले. प्लाटोमेटने फक्त मजूर समस्या नाहीच तर कांदा पिकातील अनेक समस्या सोडवून शेतकऱ्यांना दर्जेदार व सर्वोच्च उत्पादनाकडे नेले आहे. कांदा पिकाविषयी शेतकरी बांधवात असलेल्या कथित समजावर प्रकाश टाकून त्यांना संशोधित यांत्रिकी कारणाकडे नेण्यात त्यांना यश मिळाले आहे.
‘एस. पी. अग्रो’ इनोव्हेशन आता हि यंत्रे विदेशात निर्यात देखील करत आहे. अजून नाविन्यपूर्ण यंत्राचा शोध लावून शेतकऱ्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी ते प्रयत्न करत राहणार आहेत.
देशभरातील शेतकरी देत असलेल्या सततच्या प्रोत्साहनामुळे एस.पी. ऍग्रो इनोव्हेशन आता सातासमुद्रापार कृषी यांत्रिकीकरणात नवी उडी घेत आहे. सदरचा हा टप्पा म्हणजे कांदा लागवड मशीन हे आफ्रिका खंडातील काही देशात शेतकरयांच्या मदतीसाठी निर्यात केले जात आहे. या यंत्राचा पूजन समारंभ २५ मे २०२३ रोजी,सायंकाळी ४ वाजता, महंत ह.भ.प उद्धवगीरीजी महाराज मंडलिक यांच्या शुभहस्ते व जीवरसायन तज्ञ डॉ. प्रफुल्ल गाडगे, राहुरी कृषी बाजारसमिती सभापती श्री. अरुण तनपुरे, व लोकनियुक्त नगरध्यक्ष देवळाली प्रवरा श्री. सत्यजित दादा कदम पाटील उपस्थितीत राहणार आहेत.