सध्या खरिपातील पिके काढणीला आली आहे. हंगामातील प्रामुख्याने शेती घेतली जाणारी पिके म्हणजे कापूस होय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महागाईचा फटका बसून मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. ज्याचा कुठे ना कुठे फटका भारतीय बाजारपेठेला बसत आहे. तर दुसरीकडे दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मग त्यासाठी खर्च हा आलाचं. आता हाच खर्च करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची विक्री करू शकतात. मात्र दिवाळीसाठी लागणाऱ्या खर्चाएवढ्या च कापसाची विक्री करावी, असा सल्ला शेतकऱ्यांना तज्ज्ञांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया याच काय कारण आहे.
गरजेपुरत्याच कापसाची करा विक्री
दिवाळीच्या मुहूर्तावर खर्च लागेल तितक्याच कापसाची विक्री करावी. विनाकारण बाजारात संपूर्ण कापूस आणू नये. यामुळे कापसाची आवक बाजारात आणखी वाढेल. ज्याचा परिणाम कापसाच्या दरावर होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई करू नये, असा सल्ला जाणकारांनी व्यक्त केलं आहे.
आगामी काळात मिळेल का कापसाला दर?
यंदा देशात 128 लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी करणेत आलीय. तर अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाल आहे. मागील हंगामात कापसाला 14 हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तर कापसाचे दर सध्या 7,500 ते 8,000 रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. म्हणजेच यंदा कापसाला कमी दर मिळतोय.
तर दुसरीकडे सध्या सुत गिरण्या देशाल 55 ते 60 टक्के सूतगिरण्या पुर्णपणे बंद आहेत. त्यामुळे कापसाची मागणी घटली आहे. मात्र आगामी काळात सुत गिरण्या चालू झाल्या की कापसाची मागणी वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता घाई न करता टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करावी. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाला चांगला दर मिळेल. तर तज्ञांच्या मते यंदा कमीत कमी कापसाला 8 हजार ते 8 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळू शकतो. तर हा दर जास्तीत जास्त वाढूही शकतो.
यंदा बाजारात सध्याचे सरासरी दर
राज्यात 7,500 ते 8,400 रुपये दक्षिण भारत 7,600 ते 10,200 रुपये तर उत्तर भारत 7,800 ते 8,400 रुपये दर मिळत आहे.