महसूल विभागाची विशेष मोहीम : वेळ तसेच पैशांचीही होणार बचत….
वारसा हक्काने चालत आलेल्या शेतजमिनीची वाटणी अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे क्लिष्ट बनून जाते. काहीवेळा ही प्रक्रिया खर्चिकही ठरू शकते. मात्र, आता वारसांमध्ये सामंजस्य असेल तर कमी वेळेत व केवळ १०० रुपयांच्या स्टैप पेपरच्या माध्यमातून शेतजमिनीचे विभाजन करून देण्याची विशेष मोहीम जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी आखली आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार दिवाणी पद्धता आधानयम १९४७ मधाल तरतुदीत विषद करण्यात आली आहे.पपरवर करून दण्याचा माहाम हाता घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.
ओम्बासे यांनी सर्व तहसीलदारांनी शेतजमिनीचे विभाजन करण्यासाठी मोहीम स्वरूपात हे काम प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश गुरुवारी काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. यामुळे वेळ व पैशांचा खर्च चांगलाच कमी होणार आहे. दरम्यान शेतजमिनीच्या एकत्रित किंवा संयुक्त धारकांपैकी कोणत्याही एका व्यक्तीने तहसीलदारांकडे जमीन विभाजनासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. या मोहिमेचा आवश्यक धारकांनी लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ.ओम्बोसे यांनी केलं आहे.