Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Consolidated Casino Network: Fast‑Track Slots, Crash Games & Crypto Wins

August 14, 2026

Julius Casino : Gains rapides et sensations instantanées

August 14, 2026

Chicken Road: Snabb‑Hit Crash Gaming för den Snabbtänkande Spelaren

August 14, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » सोयाबीन पेरणी आणि बीजप्रक्रिया माहिती
ताज्या बातम्या

सोयाबीन पेरणी आणि बीजप्रक्रिया माहिती

Neha SharmaBy Neha SharmaMay 29, 2022No Comments5 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सोयाबीनची पेरणी  ७५ ते १०० मिलीमिटर पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीमध्ये वापसा असताना १५ जुलै पर्यंतच पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. जमिनीत चांगली ओल असल्यावरच पेरणी करावी. पेरणी करून पाणी दिल्यास बियाण्याची उगवण कमी होते.

पेरणी करताना पट्टा पद्धत वापरावी. दोन ओळीतील अंतर ३० सेंमी ते ४५ सेंमी व दोन रोपातील अंतर ५ ते ८ सेंमी याप्रमाणे पेरणी करावी. (३० x ८ सेंमी) किंवा (४५ x ५ सेंमी) जेणेकरून रोपांची संख्या ४ ते ४.५ लाख एवढी राहील.

पेरणी करताना बियाणे ४ सेमी. पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. तांबेरा प्रभावित भागामध्ये पाण्याची सोय आहे तेथे सोयाबीनची पेरणी लवकर म्हणजे १५ मे ते २० मे च्या दरम्यान करावी.फुले अग्रणी, फुले संगम या तांबेरा प्रतिबंधक वाणाची पेरणी करावी त्यामुळे हे पिक तांबेरा रोगास अनुकूल वातावरण होईपर्यंत पक्क होऊन तांबेरापासुन होणारे नुकसान टाळता येते.

पावसाच्या उशीरा आगमनामुळे पेरणीस विलंब झाल्यास सोयाबीनच्या हळव्या वाणांची लागवडीसाठी निवड करुन पेरणीसाठी प्रति हेक्टरी २५ टक्के जास्त बियाणे वापरावे व दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. ठेवावे.हंगामात नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाल्यास होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी सोयाबीनची पेरणी बीबीएफ यंत्राने करावी किंवा दर चार ओळीनंतर चर काढावेत.

बीजप्रक्रिया : बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वी मिश्र उत्पादन कार्बोक्झीन ३७.५% + थायरम ३७.५% याची ३.० ग्रॅम/कि.ग्रॅ. बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. या बीजप्रक्रियेमुळे सोयाबीनचे कॉलर रॉट, चारकोल रॉट व रोपावस्थेतील इतर रोगांपासून संरक्षण होते.

किंवा बियाण्यास ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम/कि.ग्रॅ. बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.जीवाणूसंवर्धक रायझोबियम जापोनिकम व पी. एस. बी. प्रत्येकी २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाण्यास पेरणीपूर्वी २-३ तास अगोदर लावून सावलीत वाळवावे.

बीजप्रक्रिया करताना बियाणे जोरात घासू नये तसेच प्रथम बुरशी नाशकाची प्रक्रिया करून नंतर जीवाणूसंवर्धकची प्रक्रिया करावी.बीजप्रक्रियेसाठी वनामकृवि, परभणी निर्मित द्रवरुप जैविकसंवर्धक (रायझोफॉस) सुद्धा १० मिली/१ कि.ग्रॅ. बियाणे या प्रमाणात उपयोग करावा. कमीत कमी ७० टक्के उगवणशक्तीचे प्रती हेक्टरी ७० ते ७५ किलो बियाणे वापरावे. घरचे बियाणे वापरायचे असल्यास घरच्या घरी उगवण शक्ती तपासूनच पेरणी करावी.

जमीन :मध्यम काळी पोयट्याची, चांगली निचरा होणारी.

पूर्वमशागत :एक नांगरट, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी.

सुधारित वाण: जे.एस.३३५, एम.ए.सी.एस.११८८, फुले कल्याणी (डी.एस.२२८), जे.एस.९३०५, के.एस. १०३, फले अग्रणी (केडीएस ३४४)

पेरणी व लागवडीचे अंतर :पेरणी खरीपात जुनच्या पहिल्या पंधरवड्यात वापशावर करावी. पेरणी ४५ X ०.५ सें.मी. (भारी जमीन) किंवा ३० X १० सें.मी. (मध्यम जमीन) अंतरावर करावी.

बियाणे: सलग पेरणीसाठी ७५-८० किलो प्रति हेक्टर तर टोकण पेरणीसाठी ४५-५० किलो प्रति हेक्टर बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया – बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कार्बेन्डेझीम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. तसेच नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन गटाचे रायझोबियम २५० ग्रॅम + स्फुरद विरघळणारे जीवाणू २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास चोळावे.

आंतरपिके: सोयाबीन + तूर (३:१) या प्रमाणात घ्यावे.

खत मात्रा :भरखते : चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी २५ ते ३० गाड्या वापरावे.वरखते : सोयाबीन पिकास हेक्टरी ५.० किलो नत्र आणि ७५ किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे.

आंतरमशागत तणांच्या बंदोबस्तासाठी पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी पेंडिमेथॅलीन १.० ते १.५ किलो क्रियाशील घटक ६०० ते ७०० लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावे. पीक उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी एक कोळपणी व नंतर खुरपणी करुन शेत तणमुक्त ठेवावे. अथवा पीक उगवणीनंतर २१ दिवसांनी प्रति हेक्टरी इमॉजिथॅपर क्रियाशील घटक ०.१ ते ०.१५ किलो ५०० ते ६०० लिटर पाण्यामध्ये मिसळून तणांवर फवारावे.

 

पाणी व्यवस्थापन :पिकाला फांद्या फुटताना (पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी), फुलो-यात असतांना (पेरणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी) पावसाने ताण  दिल्यास पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

पीक सरंक्षण :महाराष्ट्रात सोयाबीन पिकास पाने खाणा-या अळ्या, खोड माशी या किंडीचा व तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. खोडमाशीच्या प्रादुर्भाव झाल्यास बाल्यावस्थेत रोपाचे एखादे पान कडेने वाळू लागते आणि त्याची एखादी फांदी सुकलेली आढळते. ब-याचदा ग्रासित रोपांवर जमिनीपासून काही अंतरावर छिद्रेही आढळतात आणि त्यामुळे उत्पादनात १५ टक्केपर्यंत नुकसान संभवते.

पाने खाणारी स्पोडोप्टेरा किडीची अंडी समुहात घातली जातात. अळ्या सुरवातीस समुहानेच पानावर उपजिविका करतात. या अवस्थेत पानांचा पापुद्रा शाबूत ठेऊन केवळ त्यातील हरितद्रव्य संपुष्टात आणतात. त्यामुळे हिरवी दिसणारी पाने पांढरट पडून पारदर्शक होताना दिसतात. तिसरी कात टाकल्यानंतर अळ्या स्वतंत्ररित्या उपजिविका करण्यासाठी शेतभर पसरतात. वाढलेले शरीर, वजन व त्यामुळे वाढलेली प्रचंड भुक यामुळे अळ्या आधाशासारख्या पानावर तुटून पडतात व शेंगेतील दाणेही खाऊ लागतात. किडीच्या उपद्रवाचा आगाऊ अंदाज घेऊन नुकसान टाळण्यासाठी हेक्टरी ५ स्पोडोलूरचा वापर करण्यात आलेले फेरोमेन सापळे नियंत्रणासाठी अंडी समुहांचा तसेच समुहाने आढळणा-या अळ्यांचा वेळीच नायनाट केल्यास रासायनिक किटकनाशकांचा वापर टाळता येतो. रासायनिक किटकनाशकांचा वापर करणे अनिवार्य झाल्यास क्लोरपायरीफॉस २०%  २० मिली, सायपरमेथ्रिन २५ टक्के ४ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.

रोग::तांबेरा या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके येतात व पाने तपकिरी पडतात. आर्द्रतायुक्त हवामान, वारा, रोपांची जास्त संख्या यामुळे पिकात हवा खेळण्याचे कमी झालेले प्रमाण या बाबी रोगास आमंत्रित करतात. या रोगाने शेंगा पिवळसर तपकिरी पडतात. ब-याचवेळा अकाली पानगळ होते. दाण्यांच्या वजनात लक्षणीय घट होते व हेक्टरी उत्पादन घटते. तांबेरा प्रभावित भागात (सांगली, कोल्हापूर व सातारा) पेरणी शक्यतो १५ मे ते २५ जुनच्या दरम्यान करावी. फुले अग्रणी कल्याणी सारख्या या रोगास बळी न पडणा-या, जातीचा वापर करावा. प्रोपीकोनझॉल यापैकी एखादे बुरशीनाशकाची फवारणी १ लिटरला १ मिली या प्रमाणात करावी. पिकाच्या अवस्थेनुसार १-२ फवारण्या १५ दिवसाचे अंतराने गरजेनुसार घ्याव्यात.

 

source : कृषी विभाग , राज्य शासन

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Consolidated Casino Network: Fast‑Track Slots, Crash Games & Crypto Wins

August 14, 2026

Julius Casino : Gains rapides et sensations instantanées

August 14, 2026

Chicken Road: Snabb‑Hit Crash Gaming för den Snabbtänkande Spelaren

August 14, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Consolidated Casino Network: Fast‑Track Slots, Crash Games & Crypto Wins

ताज्या बातम्या August 14, 2026

1. Quick‑Hit Play: The Pulse of Short, High‑Intensity SessionsWhen the night is young and the…

Julius Casino : Gains rapides et sensations instantanées

August 14, 2026

Chicken Road: Snabb‑Hit Crash Gaming för den Snabbtänkande Spelaren

August 14, 2026

Tower Rush: Il Gioco da Casinò Online Velocissimo Che Ti Mette sulla Sedia

August 14, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.