राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक घोषणा केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यासाठी ई-पीक पाहणी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. जी आता तात्पुरती राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रद्द केली आहे.यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
ही अट रद्द केल्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण ही ई-पीक पाहणी प्रक्रिया करताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत होत्या. यामुळे याबाबत शेतकरी अनेकदा मागणी करत होते. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत ही घोषणा केली आहे.
ही अट तात्पुरती हटवल्यानंतर शेतकऱ्यांच्या ही अडचण दूर होऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळण्यास मदत होणार आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे झालेल्या नुकसानीची तीन दिवस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली. त्याचवेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून ई-पीक पहणीची अट रद्द करावी अशी मागणी करण्यात आली.
यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णयानंतर स्थानिक पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करावे लागणार आहेत. त्याचबरोबर नुकसान झालेला कोणताही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही अशी सरकारची भूमिका असल्याचं देखील विखे पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान, यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ज्यासाठी राज्य सरकारकडून एनडीआरएफच्या दुप्पटीने आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. यामुळे आता शेतकऱ्याच्या हातात मदत कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.