देशातील बाजारात हरभरा दर आजही दबावात आहेत. काही बाजारांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक आणि नाफेडच्या विक्रीचा दरावर दबाव आहे.

यंदा देशात हरभरा लागवड कमी झाली. त्यातच बदलते हवामान आणि पावसाचा पिकाला फटका बसतोय.

मग या स्थितीत हरभरा बाजार कसा राहील? यंदा हरभऱ्याला दराचा आधार मिळेल का? पाहुयात बुलेटीनच्या शेवटी.

देशातील काही बाजारात सध्या नवा हरभरा दाखल होत आहे. तर दुसरीकडे नाफेडही स्टाॅकमधील हरभरा कमी दरात बाजारात आणत आहे.

अनेक केंद्रावर नाफेडची विक्री सुरु आहे. त्यामुळे हरभरा दरावर दबाव आहे. सध्या बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार ५०० ते ४ हजार ९०० रुपये दर मिळत आहे.

सध्या प्रक्रिया उद्योग गरजेप्रमाणे हरभऱ्याची खरेदी करत आहे. बाजारावर नाफेडच्या विक्रीचाही दबाव असल्याने उद्योग आणि व्यापारी मोठी खरेदी करताना दिसत नाहीत.

मात्र या महिन्यात रमजानसाठी हरभऱ्याला मागणी येऊ शकते. तर यंदा हरभरा लागवड कमी झाली.

त्यातच मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेश, उत्तर प्रेदश, राजस्थान, गुजरात या भागातील हरभरा पिकाला थंडी, धुके आणि पावसाचा फटका बसत आहे.

पुढीक काळात पावसाची अंदाज व्यक्त केला जात आहे. या सर्व कारणांनी यंदा हरभरा उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.

त्यामुळं हरभरा दरात जास्त नरमाई येण्याची शक्यता कमीच आहे. पण यंदाही हरभरा बाजाराची भीस्त सरकाच्या खेरदीवरच राहील. सध्या नाफेडकडे साठाही भरपूर आहे.

त्यामुळं नाफेड यंदा किती हरभरा खरेदी करेल, यावर बाजाराची नजर असेल. नाफेडने चांगली खरेदी केल्यास हरभरा दर हमीभावाच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.