मक्याच्या दरात सध्या घसरण होत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मक्याचे चांगले उत्पादन आल्याने तसेच ब्राझिल व अन्य दक्षिण अमेरिकन प्रदेशातून होणारी आवक, असे दुसरे कारण आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
सध्या दर कधी वाढणार याची शेतकरी वाट बघत आहेत. निर्यातक्षम मक्याला मुंबई पोर्टमध्ये दोन हजार रुपये क्विंटलपर्यंतचा दर मिळत आहे. गतवर्षी हाच दर २४०० ते २५०० रुपयांपर्यंतचा होता.
महाराष्ट्रासोबतच उत्तर-प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, कर्नाटकातही मक्याचे पीक मोठ्या क्षेत्रावर घेतले जात आहे.
सेच औरंगाबाद ही मक्याची मोठी बाजारपेठ आहे. येथून माल मुंबईला निर्यात करण्यासह देशभरातील स्टार्च कंपन्या, कुक्कुट पालन कंपन्यांना पुरवठा केला जातो. यामुळे येथे व्यापारी येत असतात.
एका स्टार्च कंपनीला ३०० ते एक हजार टन मका दररोज लागतो. औरंगाबादेतील बाजारपेठेत हंगामात दररोज ५० हजार ते ७५ हजार क्विंटलने मक्याची आवक होत असते. मागील आठ दिवसात आवकही घटली आहे.