Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Tillstånd och Rättvist Spel på Paf Casino i Sverige

November 2, 2026

Robocat Casino – Οι Κορυφαίοι Προγραμματιστές Παιχνιδιών και Πάροχοι Λογισμικού στην Ελλάδα

November 2, 2026

Ιστορικό Daily Jackpot στο Duck Hunters Slot προς Παρακολούθηση στην Ελλάδα

November 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » देशातील कापूस लागवडीत घट होण्याची शक्यता
ताज्या बातम्या

देशातील कापूस लागवडीत घट होण्याची शक्यता

Neha SharmaBy Neha SharmaJuly 24, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

देशात उत्तर भारतातील कापूस लागवड यंदा स्थिर आहे. परंतु देशात इतरत्र लागवड कमी होईल, असे दिसत आहे. देशात मागील हंगामात १२९ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यंदा ही लागवड १२६.५० लाख हेक्टरपर्यंत राहू शकते, असाही अंदाज आहे.

यातच उत्तर भारतातील कापूस पिकाला अतिपावसाचा फटका बसला आहे. पंजाब, हरियानामध्ये कापूस पिकाचे ४० ते ४५ टक्के नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात मागील किंवा २०२२-२३ मध्ये कापूस लागवड ४२ लाख हेक्टरवर झाली होती.

मागील वर्षी राज्यात १८ जुलैअखेर ३८ लाख ७८ हजार हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झाली होती. यंदा १८ जुलै अखेर ३८ लाख ३३ हजार हेक्टरवर कापसाची लागवड राज्यात झाली आहे.

त्यात काहीशी घट होवून लागवड ४० लाख हेक्टरवर स्थिरावेल, असे दिसत आहे. लागवडीचे आकडे येतच आहेत. परंतु लागवडीची मुदत महाराष्ट्र व इतर भागात संपली आहे. १५ जुलैपर्यंत राज्यात कोरडवाहू कापूस लागवड झाली आहे.

तेलंगणातही जुलैच्या मध्यापर्यंतच लागवड झाली आहे. तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटकातील ९५ टक्के कापसाखालील क्षेत्र कोरडवाहू असते. तर फक्त पाच टक्के क्षेत्राला सिंचनाची व्यवस्था आहे. पाऊस उशिरा आल्याने महाराष्ट्रातील लागवडीला फटका बसला आहे.

राज्यात सर्वाधिक कापूस लागवड जळगाव जिल्ह्यात केली जाते. जिल्ह्यात यंदा साडेपाच लाख हेक्टरवर कापूस लागवड अपेक्षित होती. परंतु ही लागवड १५ जुलैपर्यंत चार लाख ४५ हजार हेक्टरवर झाली आहे. ही लागवड यंदा कमीच राहील, असेही संकेत आहेत.

उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, राजस्थानमध्ये एप्रिलमध्येच कमाल क्षेत्रात कापूस लागवड पूर्ण झाली आहे. तेथे लागवडीत घट फारशी झालेली नाही. तेथे कापसाखालील ९५ टक्के क्षेत्र ओलिताखाली आहे. तेथील कापूस पीक तीन महिन्यांचे झाले आहे.

त्यात पुढील काही दिवसांत वेचणी शक्य आहे. परंतु पावसाने तेथे पूर्व भागातील हंगामाला फटका बसला आहे. गुजरातमध्ये सुमारे ५५ टक्के व मध्य प्रदेशातील ५० टक्के कापसाखालील क्षेत्रही ओलिताखाली आहे.

उत्पादनावर परिणाम शक्य

देशात महाराष्ट्र व तेलंगणा ही राज्ये कापूस लागवडीत व उत्पादनातही अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्रातून ८५ ते ९० लाख कापूसगाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) अपेक्षित असते. तर तेलंगणात ५० ते ५१ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे. पण याच राज्यांतील कापूस पिकाची लागवड व इतर बाबींविषयी समाधानकारक चित्र नाही. यामुळे पुढे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, असाही अंदाज आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Tillstånd och Rättvist Spel på Paf Casino i Sverige

November 2, 2026

Robocat Casino – Οι Κορυφαίοι Προγραμματιστές Παιχνιδιών και Πάροχοι Λογισμικού στην Ελλάδα

November 2, 2026

Ιστορικό Daily Jackpot στο Duck Hunters Slot προς Παρακολούθηση στην Ελλάδα

November 1, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Tillstånd och Rättvist Spel på Paf Casino i Sverige

ताज्या बातम्या November 2, 2026

Jag har som vana att kontrollera licensen först och främst, alltid. För mig är den…

Robocat Casino – Οι Κορυφαίοι Προγραμματιστές Παιχνιδιών και Πάροχοι Λογισμικού στην Ελλάδα

November 2, 2026

Ιστορικό Daily Jackpot στο Duck Hunters Slot προς Παρακολούθηση στην Ελλάδα

November 1, 2026

Veilig en Spannend Gamen in de regio bij Oha Casino

October 29, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.