Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

SG Casino: Ganancias Rápidas y Juego de Slots de Alta Intensidad

August 11, 2026

HugoBets Casino:s ikonografi hyllas av svensk designer

August 9, 2026

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

August 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाने हजारो क्विंटल मिरची पिकाचे नुकसान झाले आहे.
ताज्या बातम्या

नंदुरबारमध्ये अवकाळी पावसाने हजारो क्विंटल मिरची पिकाचे नुकसान झाले आहे.

Neha SharmaBy Neha SharmaDecember 15, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नंदुरबार जिल्हाभरात अवकाळी पाऊस होत असून याचा फटका नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिरची  व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे. झालेल्या अवकाळी पावसात  25 हजार क्विंटल मिरची ओली झाल्याचा अंदाज बाजार समिती व्यक्त करत आहे तर दुसरीकडे ढगाळ वातावरणाचा फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांनाही बसत आहे ढगाळ वातावरणामुळे मिरची वरील विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ म्हणून नंदुरबार बाजार समितीची  ओळख आहे. गेल्या तीन-चार दिवसापासून खराब असलेल्या वातावरणाचा नंदुरबार बाजार समितीतील मिरची व्यापारी आणि शेतकरी यांना मोठा फटका बसत आहे. नंदुरबार बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली 25000 क्विंटल पेक्षा जास्त ओली लाल मिरची सुकवण्यासाठी पथार्‍यांवर टाकली होती. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मिरची पाण्यात सापडून दहा ते पंधरा टक्के मिरची खराब होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यातून मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता बाजार समितीने व्यक्त केली आहे.

नंदुरबार येथील मिरची व्यापारी रवी कोठारी म्हणाले कि अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदल यांचा मोठा फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून यावर्षी शेतकऱ्यांना दर चांगला मिळत असला तरी मिरचीचे उत्पादन निम्म्याने घटले आहे. मायबाप सरकारने नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचा विचार करून त्यांना भरपाई द्यावी हीच अपेक्षा असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यात वातावरणात होणाऱ्या बदलाचा सर्वाधिक फटका मिरची व्यापारी आणि शेतकऱ्यांना बसत असल्याचे समोर आले आहे. वारंवार होणाऱ्या ढगाळ वातावरण आणि दोन महिन्यात दोनदा अवकाळी पावसाचा बसलेला माऱ्यामुळे मिरची काळी पडणे आणि मिरची पिकावर येणाऱ्या विविध रोगांमुळे उत्पादनात घट आले आहे. तसेच अवकाळी पावसात सापडलेल्या मिरचीची पतवारी कमी झाल्याने तिला मिळणारा दरही कमी झाला आहे. आवक कमी असल्याने भाव चांगला मिळत असला तरी दोन महिन्यात दोन वेळा झालेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे मिरचीचे उत्पादन प्रचंड घटल्याचे व्यापारी सांगतात.  ढगाळ वातावरण झाल्यानंतर  सुकवण्यासाठी टाकलेली हजारो क्विंटल मिरची गोळा करून तिच्यावर झाकण्यासाठी प्लास्टिक टाकण्याची मोठी कसरत व्यापाऱ्यांना करावी लागते त्यात मजूर टंचाई आणि अनेक समस्या असल्याने मिरची व्यापारी हवाल दिल झाल्याचे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर म्हणाले

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

SG Casino: Ganancias Rápidas y Juego de Slots de Alta Intensidad

August 11, 2026

HugoBets Casino:s ikonografi hyllas av svensk designer

August 9, 2026

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

August 9, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

SG Casino: Ganancias Rápidas y Juego de Slots de Alta Intensidad

ताज्या बातम्या August 11, 2026

Cuando el teléfono suena y deseas una emoción ultrarrápida, SG Casino es el lugar para…

HugoBets Casino:s ikonografi hyllas av svensk designer

August 9, 2026

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

August 9, 2026

Is de Zumospin Casino App Veilig om te Installeren in Nederland

August 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.