• Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रीय हल्दी बोर्ड की स्थापना होगी

October 3, 2023

दुधारू पशुओं में दूध उत्पादकता बढ़ाने योग्य चारे एवं दाने

October 3, 2023

सोयाबीन फसल में दाने भरने की अवस्था में फली छेदक कीट के प्रकोप की संभावना; कृषि अनुसंधान ने जारी की सलाह

October 3, 2023
Facebook Twitter Instagram
Facebook Twitter Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » पेरणी यंत्रांमुळे होतेय वेळ, बियाणे बचत
शेतीविषयक

पेरणी यंत्रांमुळे होतेय वेळ, बियाणे बचत

Neha SharmaBy Neha SharmaMay 26, 2023No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पावसाच्या अनिश्‍चिततेवर मात करण्यासाठी पेरणी रुंद वरंबा सरी पद्धतीने करावी. कृषी यांत्रिकीकरणाचा मुख्य उद्देश म्हणजे निविष्ठांचा कार्यक्षम वापर, वेळेवर शेतातील कामाची पूर्तता, उत्पादन खर्चात बचत, शेतातील कष्ट कमी करणे, नैसर्गिक संसाधानाचे संवर्धन करणे आणि उत्पादनात वाढ हा आहे.

बैलचलित बहूपीक टोकण यंत्र

– पिकानुसार वेगवेगळ्या तबकड्या सहज बदलता येतात. बियाणे व खत योग्य प्रकारे पेरता येते.

– दोन फणांतील अंतर गरजेनुसार बदलता येते. एकाच वेळेस खत, बी पेरणी, रासणी आणि तणनाशक फवारणी करता येते.

 

 

– आंतरमशागतीच्या वेळी पिकातील अंतरानुसार पास बसून कोळपणी, फवारणी करता येते.

– सौरऊर्जेवर चालणारे फवारणी यंत्र वापरून फवारणी करता येते.

– सर्व यंत्रे एकाच फ्रेमवर आवश्यकतेनुसार बसविता येतात.

– वेळ व खर्चाची २५ ते ५० टक्के बचत.

– शेतीच्या कडेला वळताना बी आणि खत बंद करता येते.

– यंत्र एका मजुराच्या साह्याने चालविता येते.

फायदे

– जास्त कार्यक्षमतेमुळे वेळेवर पेरणी. २५ ते ३० टक्के वेळ, ६ ते २० टक्के बियाणे, ५५ ते ६५ टक्के मजुरीची बचत.

– पीक खर्चात ३० ते ५० टक्के बचत, उत्पादनात ५ ते २० टक्के वाढ.

– यंत्राच्या साह्याने आंतरपीकसुद्धा घेता येते.

– बियाणे, खते योग्य खोलीवर व अंतरावर एकाचवेळी योग्य मात्रेत पेरता येतात.

– कार्यक्षमता ः ५ एकर प्रति दिवस.

बैलचलित कापूस बी टोकण आणि खत पेरणी यंत्र :

– खत, बियाणे पेरणी, फुली मारणे आणि बियाण्यावर माती लावण्याचे काम एकाच वेळेस होते.

– यंत्रामध्ये बियाणे, खतासाठी वेगवेगळ्या पेट्या.

– दोन ओळींतील अंतर ९० सेंमी, १२० सेंमी, १३५ सेंमी आणि १५० सेंमी गरजेप्रमाणे ठेवण्याची सोय असून, त्याप्रमाणे आखणी करता येते.

– दोन रोपांतील अंतर १५ सेंमी, ३० सेंमी आणि ४५ सेंमी ठेवता येते.

– खत आणि बियाणे पेरण्यासाठी वेगळ्या तबकड्या वापरता येतात.

– खत आणि बी पेरल्यानंतर रासणी करण्यासाठी लोखंडी फ्रेम आहे.

– बियाणे पेटीची क्षमता २ किलो, खत पेटीची क्षमता २५ किलो आहे.

एक बैलचलित दोन फणी टोकण यंत्र, एक पासेचे कोळपे, दुहेरी खात कोळपे, सरी पडणारे यंत्र :

– एकात्मिक पीक पद्धतीसाठी ही उपयुक्त अवजारे आहेत. भाजीपाला उत्पादकांना उपयुक्त आहे.

– अवजार चालविण्यासाठी एका मजुराची आवश्यकता असते.

– टोकण यंत्राद्वारे एकाच वेळी खत आणि बी पेरता येते. खत, बियाण्याची १५ ते २० टक्के बचत होते.

– तण काढणीक्षमता ८८ टक्के आहे.

– सरी यंत्राद्वारे १५ ते ३५ सेंमी रुंद आणि १० ते १५ सेंमी खोलीची सरी तयार होते. पारंपरिक पद्धतीपेक्षा खर्चामध्ये २० ते ३५ टक्के बचत होते.

बहुउद्देशीय बैलचलित पेरणी, फवारणी आणि रासणी यंत्र :

– खत, बी पेरणी, रासणी तसेच तणनाशक फवारणी एकाच वेळी करता येते.

– पेरणीनंतर पेरणी पेटी काढून तेथे कोळपे बसून कोळपणी, फवारणी करता येते.

– दोन्ही बाजूंस फण बसविण्याची सोय असल्याने गादीवाफ्यावरील पिकांमध्ये कोळपणी आणि सोबत सऱ्या मोकळ्या करता येतात.

– पेरणीसोबत तणनाशक, कोळपणीसोबत कीटकनाशकाची फवारणी केल्यामुळे ४० ते ५० टक्के वेळ आणि मजुरीमध्ये बचत होते.

– यंत्र सौरचलित आहे. यंत्रासाठी एका मजुराची आवश्यकता. कार्यक्षमता ४ ते ५ एकर प्रति दिवस आहे. Sowing Machine

पाच फणी रुंद वरंबा सरी, बियाणे- खत पेरणीसह फवारणी, रासणी यंत्र :

– ट्रॅक्टरचलित एकाच फ्रेमवर पाच ओळीचे बीबीएफ (रुंद वरंबा आणि सरी), रासणी व फवारणी यंत्र विकसित करण्यात आले आहे.

– एकाच वेळी रुंद वरंब्यावर पेरणी, रासणी, तणनाशक फवारणी शक्य. खर्च आणि वेळेची बचत.

– सरी यंत्रामुळे योग्य प्रकारे वाफे तयार होऊन त्यावर शास्त्रीय पद्धतीने पेरणी होऊन तणनाशक फवारणीमुळे तणाचा प्रादुर्भाव कमी होतो.

– पावसाचे पाणी अधिक पडले ते वाफ्यामुळे वाहून जाते. कमी पाऊस झाला तरी पाणी सऱ्यांमध्ये मुरते. मूलस्थानी जलसंवर्धन होऊन पिकास, तसेच पुढील हंगामातील पिकांस फायदा. पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात लाभ.

– गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी, हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. त्यामुळे बियाण्याची उगवण चांगली होते. पिकाची जोमदारपणे वाढ होते.

ट्रॅक्टरचलित बीबीएफ, रासणी, फवारणी यंत्राची तांत्रिक माहिती

अ. क्र.—यंत्राचे घटक—विवरण

१ —फणांची संख्या—५ —

२ —फणांमधील अंतर—पिकानुसार ३० ते ४५ सेंमी

३ —बियाण्यांमधील अंतर—१”-५”

४ —बियाण्यांचा प्रकार—सर्व प्रकारचे बियाणे

५ —बियाणे क्षमता—१२-२० किलो

६ —खताची क्षमता—१२-२० किलो

७ —आवश्यक ट्रॅक्टर—४५ एचपी आणि त्यापुढील क्षमता.

८ —ॲक्सेसरीज—सारा, कव्हरिंगप्लेट, फवारणी

९ —फ्रेम साइज—२७३० × ४८ सेंमी

१० —एकूण वजन—३५० किलो

यंत्राची रचना –

– यंत्राच्या लोखंडी सांगाड्यावर बी आणि खत पेटी बसविलेली आहे. बीजपेटीतील बियाणे प्रमाणित करण्यासाठी खाचा असलेला रोलर आहे. आवश्‍यकतेनुसार बियाण्याची मात्रा कमी-जास्त करण्यासाठी रोलरची बीजपेटीतील लांबी कमी-जास्त करावी लागते. त्यासाठी यंत्रणा आहे. त्याद्वारे बियाणे, खताची मात्रा प्रमाणित करता येते.

– पेरणी यंत्रास जमिनीवर चालणाऱ्या चाकाद्वारे गती दिली जाते. वाहतूक सुलभ होण्यासाठी यंत्रास दोन चाके आहेत. या चाकांद्वारे पेरणीची खोली कमी-जास्त करता येते.

– यंत्राची कार्यक्षमता तीन ते पाच एकर प्रति दिवस आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

राष्ट्रीय हल्दी बोर्ड की स्थापना होगी

October 3, 2023

मूंग-मसूर में मंदी जारी, गेहूं में हल्की तेजी

October 2, 2023

मोदी सरकार का बड़ा फैसला, इन चार देशों में जाएगा भारत का प्याज

October 2, 2023

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Demo
Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

राष्ट्रीय हल्दी बोर्ड की स्थापना होगी

शेतीविषयक October 3, 2023

प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी ने गत दिवस तेलंगाना में हल्दी किसानों के कल्याण के लिए…

दुधारू पशुओं में दूध उत्पादकता बढ़ाने योग्य चारे एवं दाने

October 3, 2023

सोयाबीन फसल में दाने भरने की अवस्था में फली छेदक कीट के प्रकोप की संभावना; कृषि अनुसंधान ने जारी की सलाह

October 3, 2023

मूंग-मसूर में मंदी जारी, गेहूं में हल्की तेजी

October 2, 2023

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2023 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.