वालवड (वालपापडी) चे बाजार भाव अंदाज सप्टेंबर ते डिसेंबर 2022 नमस्कार जय किसान शेतकरी मित्रांनो आज आपण वालवड ( वालपापडी) या पिकाचे सप्टेंबर ते डिसेंबर 2022 कालावधीत काय भाव रहाण्याची शक्यता आहे या विषयावर चर्चा करणार आहोत. वालवड हे पिकं वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते या मध्ये प्रकार आणि व्हरायटी पण वेगवेगळ्या पहायला मिळतात.आपण ज्या पिकाबद्दल माहिती घेणार आहोत ते वेलवर्गीय मध्ये मोडते यासाठी आपली लागवड ही दोन ओळींतील अंतर 5 फुट आणि 2 वेलीतील अंतर 1.5 फुट असेल तर आपणाला एकरी अपेक्षित उत्पादन काढता येईल.

लागवडीपासून 65/75 दिवसांत वालवड चे पीक तोडणीस येते आणि साधारण पणे 3 महिन्यापर्यंत या पासून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळत रहाते. मागील 15/20 वर्षाचा आढावा घेतला तर मे ते नोव्हेंबर हा कालावधी वालवड चे भाव वर्ष भरातील सर्वात उंचावर असलेले पहायला मिळतात.इथे सातत्याने 40/60 रुपये किलो ची सरासरी नियमितपणे पहायला मिळते. 2020 वालवड बाजार भावाचा आढावा घेतला तर जानेवारी ते एप्रिल या कालावधीत 10/20 रुपये अशी निचांकी पातळी पहायला मिळते.तर फेब्रुवारी 2020 ला 4/8 रुपये इतकी रेकॉर्ड खालची पातळी गाठली होती.

जुन ते सप्टेंबर सातत्याने 30/45 रुपये किलो वालवड चे भाव पहायला मिळाले तर आक्टोबर 2020 ला 50/60 रुपये किलो असे तेजी चे भाव पहायला मिळाले.तर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात हेच भाव घसरुन 15 ते 25 रुपये दरम्यान पहायला मिळाले.2021 ला जानेवारी ते मार्च 25/30 रुपये ची सरासरी टिकून होती एप्रिल मे महिन्यात ते 40/50 रुपये चे भाव चालले.जुन जुलै 2021 ला 50 ते 80 रुपये इतक्या उंचीवर पोहचले.ऑगस्ट ते नोव्हेंबर 2021 ला 40/50 ची सरासरी टिकून होती डिसेंबरला पुन्हा 50/60 रुपये ची उंची गाठली मात्र जानेवारी 2022 पासून भाव उतरून 20/30 रुपये किलो झाले.

फेब्रुवारी वालवड चे भाव मंदीत गेले मात्र 15 मार्च पासून भाव वाढायला लागले एप्रिल पासून 40/60 रुपये किलो चे भाव अजुनही कायम असल्याचे दिसते. सप्टेंबर ते डिसेंबर 2022 चा आढावा घेताना चालू असलेले वालवडीचे भाव पुढे ही चांगल्या पातळीवर टिकून रहाण्याची शक्यता आहे.आक्टोबर महिन्यात ते 50 ते 70 रुपये किलो पर्यंत वाढू शकतात . नोव्हेंबर महिन्यात पण 30/40 ची सरासरी टिकून राहू शकते.मात्र डिसेंबर महिन्यात वालवड चे भाव लक्षणीय घटण्याची शक्यता आहे हे साधारणपणे 25 रुपये पेक्षा कमी होण्याची शक्यता आहे.

वालवड पिकांमध्ये बगलफुट काढणे आणि वेल खुडणे अत्यावश्यक असते.हेच काम वालवड पिकांचे यश अपयश ठरवत असते. बाजार भावाचे असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या Shivaji Awate शेती बाजार भाव विचार मंच या युट्यूब चॅनलला भेट देऊन सबस्क्राईब करा धन्यवाद . शिवाजी आवटे 12/9/2022