पाण्याची कमतरता असताना पाण्याची बचत करण्यासाठीचा हमखास उपाय म्हणजे विविध प्रकारच्या आच्छादनाचा वापर करणे.

अच्छादनाच्या वापरामुळे २५ ते ३० टक्के पर्यंत पाण्याची बचत होते. पीक आणि फळबाग लागवडीमध्ये आच्छादनासाठी पी. व्ही. सी, एल. डी. पी. ई या प्रकारच्या फिल्मचा उपयोग करता येतो.

अलिकडे एल. डी. पी. ई. (LDPE) पेक्षा एल. एल. डी. पी. ई. (LLDPE) प्लॅस्टिक फिल्म आच्छादनासाठी  वापरली जाते. याचे वापरण्याचे मुख्य कारण म्हणजे अतिशय पातळ आवरण देऊ शकण्याची क्षमता आणि छेदन प्रतिकारक शक्ती.

या प्रकारच्या आच्छादनामुळे जमिनीचे तापमान वाढण्यास मदत होते. पारदर्शक आच्छादनामुळे सुर्याची किरणे जमिनीपर्यंत जाऊ शकतात. परंतु जमिन तापल्यानंतर त्यापासून निघणारी ऊर्जा आच्छादनामुळे अडविली जाते.

काळे प्लॅस्टिकचे आच्छादन

अशा प्रकारच्या आच्छादनामुळे सुर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहचू शकत नाहीत. साहाजिकच त्यामुळे जमिनीचे तापमान वाढण्यासाठी या आच्छादनाचा तितकासा उपयोग हेत नाही. मात्र या प्रकारच्या आच्छादनामुळे तणांचा उपद्रव कमी होतो.

Plastic Mulching Types : प्लॅस्टिक आच्छादनाचे विविध प्रकार कोणते आहेत ?

सुर्यकिरणे परावर्तीत करणारे आच्छादन

या आच्छादनामुळे मावा आणि तुडतुडे यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. पांढऱ्या किंवा चंदेरी रंगामुळे सुर्यकिरणे परावर्तीत होऊन पिकाला सर्व बाजूंनी सुर्यप्रकाश मिळू शकतो. त्यामुळे पिकांची जोमदार वाढ होते.

इन्फ्रारेड प्रकाशास पारदर्शी आच्छादन

या प्रकारच्या आच्छादनातून सुर्य प्रकाशातील इन्फ्रारेड किरणे जमिनीपर्यंत पोहचू शकतात. मात्र तणांच्या वाढीस उपयुक्त अशी प्रकाश किरणे पोहचू शकत नाहीत. अशा अच्छादनात काळ्या प्लॅस्टिकच्या आच्छादनापेक्षा जमिनीचे तापमान अधिक असते त्याचबरोबर तणांची वाढ रोखली जाते. या प्रकारच्या आच्छादनाचा रंग हिरवा किंवा विटकरी असतो.

रंगीत प्लॅस्टिक आच्छादने

वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या रंगाच्या प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर फायदेशिर ठरतो. प्लॅस्टिक आच्छादनाचे

विणलेले सच्छिद्र आच्छादन

अशा प्रकारचे आच्छादन गादीवाफ्यावर वापरता येते. वर्षानुवर्षे टिकणाऱ्या छोट्या फळझाडांसाठी जसे स्ट्रॉबेरी हे आच्छादन जास्त फायदेशीर ठरते. या आच्छादनाचा वारंवार गुंडाळण्याचा आणि टाकण्याचा खर्च वाचतो. अशा आच्छादनातून हवा पाणी तसेच खते जमिनीपर्यंत जाऊ शकतात परंतू तणांच्या वाढीस हे आच्छादन रोखू शकते.

स्त्रोत – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी.