Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » जिवामृत म्हणजे काय? कसे तयार करावे ? जिवामृताचे फवारणीचा परिणाम
ताज्या बातम्या

जिवामृत म्हणजे काय? कसे तयार करावे ? जिवामृताचे फवारणीचा परिणाम

Neha SharmaBy Neha SharmaMay 30, 2022No Comments6 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जिवामृत हे खत नसून अनंत कोटी उपयुक्त सुक्ष्म जिवाणूंचे सर्वोत्तम विरजन आहे.तसेच सर्वोत्तम बुरशिनाशक सर्वोत्तम विषाणू नाशक तूरोधक व सर्वोत्तम संजिवक आहे. फक्त एक वेळ वापरून पिकांचं निरीक्षण करा.

जिवामृत कसे तयार करावे?
200 ली. पाणी त्यात 10 की. देशी गाईचेच शेण (जर्सी चे अजिबात नाही)5 ते 10 ली. देशी गाईचेच गोमुत्र ( जर्सी प्राण्याचे अजिबात चालणार नाही )1 की. काळा गुळ ( केमिकल नसलेला)किंवा 4 ली.ऊसाचा रस
किंवा 10 की.ऊसाचे तुकडे,किंवा 10 की.गोड ज्वारीचे तुकडे, किंवा 1 की.गोड फळाचा गर आणी1 किलो  बेसन व 1 मुठ बांधावरची जिवानु माती.हे सर्व बॅरेल मध्ये टाकून चांगले ढवळुन पोते झाकून ठेवावे,सकाळ – संध्याकाळ 1 मिनिट काठीने ढवळावे .सूर्यप्रकाश व पावसाचे पाणी बॅरेलमध्ये पडू नये. 48 तासा नंतर जिवामृत वापराला तयार होते जास्तीत जास्त 7 दिवसापर्यंत वापरता येते. 7 दिवसानंतर सडण्याची क्रिया चालू होते .

जिवामृत कसे द्यावे?
1) सिंचनाच्या पाण्यातून देणे. 2)सरळ जमिनीवर टाकणे, 3)उभ्या पिकावर फवारनी करणे, तिन्ही प्रकारे सर्वोत्तम रिझंल्ट.

जिवामृताचे फवारणीचा परिणाम.

1) कोणत्याही झाडांची हीरवी पाने दीवसा अन्न निर्मिती करतात.या प्रक्रीयेला प्रकाशसंश्लेषन क्रिया म्हणतात. एक चौ.फुट हीरवे पान एका दिवसात सुर्यप्रकाशामधुन 12.5 kg. कॅलरी सुर्य ऊर्जा पानामध्ये जमा करतात व हवेतून कर्बाम्ल वायु घेऊन(कार्बनडायऑक्साईड)व जमिनीतून पाणी घेउन 1 चौ.फुट पान एका दीवसाला 4.5 ग्रॅम अन्न निर्मिती करतं, व त्यापासून आपल्याला 1.5 ग्रॅम अन्नधान्याचं उत्पादन मिळतं , 2.5 ग्रॅम फळांचे व ऊसाचे टनेज मिळते.याचा अर्थ जर आपन पानाचं आकारमान दुप्पट केलं तर उत्पादन दुप्पट होईल . पानाचं आकारमान वाढवनारे काही संजिवके (Harmons) असतात ते जिवामृता मध्ये असतातच म्हणून जिवामृत फवारले कि पानाचा आकार वाढतो.

2) पिकांच्या पानावर सतत रोग निर्माण करणा-या बुरशिंचा व जंतूंचा हल्ला होत असतो. जिवामृत हे अत्यंत उपयुक्त बुरशिनाशक व जंतूरोधक आहे म्हणून जिवामृत फवारल्यावर पिकावर रोग येत नाही.

3) पिकावर किडींचा हल्ला सतत होत असतो व जर पानामध्ये प्रतिकारशक्ती नसेल तर पानं किडींना बळी पडतात. जिवामृतामध्ये पानांना प्रतिकारशक्ती देनारे काही antibiotics असतात त्यामुळे जिवामृत फवारनीने पानामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते व पिक किडीपासून वाचतात.

4)आणीबाणीत जर मुळ्याच्या माध्यमातून पानांना नत्र मिळाला नाही तर पानांची वाढ थांबते परंतु काही जिवानू असे आहेत कि जे पानावर बसून थेट हवेतून नत्र घेतात व पानांना पुरवतात.त्यापैकी agito dizotopicus सारखे जिवाणू यामध्ये मुख्य भुमिका वटवतात . हे जिवाणू जीवामृतात असतात त्यामुळे हे जिवानु हवेतून नत्र घेउन पानांना देतात व झाडांची वाढ चालु ठेवतात.

5) सुर्यप्रकाशा सोबत अतीनील किरनां सारखे अत्यंत घातक विविध किरनं येत असतात ते किरनं पानावर पडले किंवा झाडांमधील अनुवंशिक गुणधर्मांमध्ये बदल होतो व झाडामध्ये विकृती निर्माण होते .जिवामृताचे फवारनी या विविध किरणांपासुन सहनशीलता देते.

6) वेगवेगळ्या पिकांच्या पानांना सुर्यप्रकाशाची वेगवेगळी तिव्रता सहन करण्याची क्षमता असते .जेंव्हा ऊन्हाळ्यामध्ये ( मार्च ते जुन) सुर्य प्रकाशाची तिव्रता 8000 ते 12000 फुट कँडल पर्यंत वाढते .ज्या पिकांना ही तिव्रता सहन होत नाही त्या पिकांची पाने या उन्हामध्ये बाष्पीभवनाचा वेग वाढवितात,त्यामुळे पानामध्ये ओलावा टीकत नाही व पानं सुकन्याची शक्यता असते आशा वेळी पानं मुळ्यांना संदेश पाठवतात , संदेश मिळताच मुळ्या पाणी पानाकडे पाठवतात. ओलावा पानामध्ये येताच ताबडतोब बाष्पीभवनाने निघुन जातो , अशा त-हेने जमिनीतील ओलावा वेगाने घटतो परिणाम पानं पिवळी पडतात , करपतात व सुकतात . जिवामृताची फवारनी केल्यानंतर अती उष्णतामाना मध्ये पानावर असलेले पूर्ण छीद्र बंद होतात , बाष्पीभवन थांबते व उष्णतेच्या लाटेत पिक करपत नाही.
जीवामृत फक्त 7 दिवस वापरावे

जिवामृता संदर्भात कांही गोष्टीं बाबतचे हितगूज आपल्या सोबत करावेसे वाटते….

देशी गाईच्या १ ग्राम शेणात ३०० कोटी जिवाणू असतात तर याचा अर्थ आपण १० किलो शेण वापरतो त्यावेळी ३० लाख कोटी जिवाणू वापरात आणतो, यामुळे परिणाम मिळतो पण चमत्कारी परिणाम नाही मिळत, आणिजर तो चमत्कारी परिणाम मिळवायचा असेल तर जिवाणूंची संख्या वाढली पाहिजे.जिवाणूंची संख्या ही पेशी विभाजणाने होते या साठी किन्वन क्रिया करणे गरजेचे आहे व ते गोड पदार्थ वापराने साध्य होते.
गोड पदार्थ वापरा साठी आपण १ किलो गूळ ( गूळ काळा सरवोत्तम, लाल मध्यम, व पिवळा किंवा पांढरट कनिष्ठ असतो, साखर आजिबात वापराची नाही) किंवा ४ लिटर ऊसाचा रस, किंवा १० किलो ऊसाचे लहाण-लहाण तुकडे, किंवा १ किलो गोड फळांचा गर वापरू शकतो.

यामुळे वैज्ञानिक पद्धतीने किण्वन क्रियेचा वेग दुप्पट वेगाने वाढत जाते. परंतु जिवाणूंच्या अगणिक संख्येला त्यांच्या हालचालीसाठी उर्जेची आवश्यकता असते ती प्रथिनाने पुर्ण होते, व कडधान्यात भरपूर प्रमाणात ही प्रथिने असतात, त्यास्तव १ किलो कोणत्याही कडधान्याचे पिठ ( सोयाबीन वगळून कारण ते गळित धान्य आहे) त्यात टाकावे.आता थोडं शेण व मुत्राच्या वापरा संबंधी, मित्रहो, सर्वांकडे देशी गाय हवी पण कांहींना ते शक्य होत नसेल तर ज्यांचे कडब्याच्या गाय असेल व साठवणूक होत असेल त्यांचेकडून शेण मुत्र घ्यावे व मोबदला रूपी तुमच्या शेतातील वैरण गाईसाठी द्यावे. ५ ते १० लिटर गोमुत्र वापरावे, गाय रात्रभर विश्रांती घेऊन पहाटेचे पहिले मुत्र देते ते सर्वात चांगले, यास्तव काँक्रिटचा गोठा उत्तम, संपुर्ण गायीचे मुत्र शक्य नसेल तर गायीचे २ व बैलाचे ३ लिटर या प्रमाणात घेतले तरी चालेल, किंवा ३ लिटर गायीचे व ३ लिटर मानवी मुत्रही चालते, मुत्र जितके जुने तितके ते चांगले, गाय जर काळी “कपिला” असेल व ती बाहेर फिरून (बधिस्त किंवा मुक्त गोठा नव्हे) चरत असेल तर अशा गायीचे शेण-मुत्र १ नंबरचे असते, कारण तिच्या बंधनमुक्त वातावरणातील हरेक वनस्पती खाण्यात येते जी तिला आवडेल व अनेक विविधतायुक्त वैरण खाल्लेने त्याचे गुणधर्म शेणा-मुतात येतात, जी दुध कमी देते जशी की खिलार गाय, अशा गायीचे शेण मुत्र प्रभावी असते,

या ही पेक्षा भाकड गायीचे शेणमुत्र चांगले असते ताण तिने चाऱ्यातून मिळवलेली उर्जा ही दुध निर्मिती साठी न वापरता शेण मुत्राच्या उत्कृष्ट दर्जाकडे वापरते म्हणून तिचे शेण मुत्र उत्तम होय. शेण १० किलो हे ताजेच असावे ते उत्तम असते, भाकड गायीस मोजून घातलेला चारा तेव्हढेच शेण मूत्र बाहेर पडते त्यात सर्वोत्तम जिवाणूंचे भांडर असते. संपुर्ण पणे गायीचे शेण उपलब्ध नसेल तर निम्मे गायीचे व निम्मे देशी बैलाचे चालते.

यात आता गरज असते ती जिवाणू युक्त मातीची, त्या साठी बांधावरची अथवा वडाच्या झाडाखालील सालीतील माती किंवा जंगलातील माती विरजण म्हणून एक मुठभर टाकावी. खरेतर जिवाणू माती म्हणजे ही पिकांची किंवा झाडांची सख्खी “आई” असते व तिचे वास्तव्य हे त्या-त्या पिकांच्या व झाडाच्या मुळीला बिलगलेल्या मातीत असते यास्तव ज्या पिकास जीवामृत द्यायचे असेल तेथील माती केंव्हाही श्रेष्ठच.
एक बॅरेल घेऊन ते नैसर्गिक सावलीत अथवा कृत्रिम सावलीत ठेवावे, त्यात २०० लिटर पाणी ( विहीर अथवा बोअरचे ) घ्यावे, वरील सर्व निविष्ठा बॅरेलमधे घालण्या पुर्वी एका बादलीत अथवा प्लास्टिक बुट्टीत पाणी घालून निविष्ठा एकजीव करून मगच बॅरेलात घालाव्यात, लाकडी काठीच्या सहाय्याने घड्याळातील काटे ज्या दिशेने फिरतात (डावीकडून उजवीकडे) तद्वत चांगले ढवळून घ्यावे, गोणपाटाने अथवा कडब्याच्या धाटापासून बनवलेल्या झाकरणाने झाकून ठेवावे, दिवसातून सकाळ संध्याकाळ चांगले ढवळावे.ही किण्वन क्रिया तो पर्यंत वाढत असते जो पर्यंत त्याचा आंबट-गोड वास येत असतो, तद्नंतर त्याची कुजण्याच्या क्रियेस सुरवात होते व जिवामृताचा रंग काळपट होऊ लागतो.

सर्व निविष्ठा बॅरेल मधे घातल्या नंतर ४८ तासा पासून ते ७ व्या दिवसा पर्यंत वापरता येते, (कांही “महाज्ञानींच्या” मते १० ते ११ दिवसा पर्यंत वापर करता येऊ शकते, पण त्यांना किण्वन क्रिया ही वेगवेगळ्या हवामानात वेगवेगळ्या गतीने होत असते याच्या अज्ञाना मुळे वैज्ञानिक दाखला देऊन आपले “महाज्ञानीत्व” दाखवून दिले ) वेळेच्या गरजे नुसार २ ते ७ दिवसापर्यंत कधी ही वापरावे, यातील ७ व्या दिवसाचे सर्वोत्तमच, कारण त्यातील जिवाणूंची ग्रोथ (वाढ) पुर्ण क्षमतेने झालेली असते.वापर ३ पध्दतीने करता येतो,१) सिंचनाच्या पाण्यातून,२) दोन झाडामधे जमिनीत पुरेशी ओल असताना जमिनी वरील आच्छादनावर,३) उभ्या पिकावर फवारणीच्या शेड्युल व प्रमाणानुसार.एकरी कमीतकमी २०० लिटर जिवामृत महिन्यातून दोन वेळा जमिनीला मिळावे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

ताज्या बातम्या June 24, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026) ▶️ JOUER Содержимое Présentation du casino BetifyAvantages…

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

B9 Game in Pakistan – a guide for new players for the number one betting casino game in Pakistan

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.