हंगाम संपल्यानंतर धान्य साठवणीकडे अनेक शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र साठवणीमध्ये योग्य काळजी न घेतल्यास किंडींच्या प्रादुर्भावामुळे धान्याचे नुकसान होऊ शकते. नवीन धान्याची एकाचवेळी आवक झाल्याने दर कमी होतात.

हे टाळण्यासाठी धान्य तीने ते चार महिने साठवण करुन अपेक्षित बाजारभाव असाताना बाजारात विकल्यास चांगला भाव मिळू शकतो.

साठवलेल्या धान्यावर सोंडकीडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा, पतंग, तांबडा भुंगा इं. किडींचा प्राददुर्भाव होऊन नुकसान होऊ शकते.

त्यामुळे धान्याला कीड लागण्याची कारणे आणि धान्य साठवणूक (Grain Storage) करताना काय काळजी घ्यावी? याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

धान्याला कीड लागण्याची कारणे

धान्यातील कीटक २० ते ४० अंश सेल्सिअस तापमानाच्या कक्षेतच क्रियाशील राहू शकतात. धान्यातील ओलाव्याचे प्रमाण ८ ते १० टक्के पेक्षा जास्त असल्यास किंडींचा प्रादुर्भांव होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात वाढते.

काही किटकांचे प्रौढ पिकांच्या पक्व अवस्थेतील दाण्यावर अंडी घालतात. अशा धान्याच्या साठवणीत पोषक हवामान मिळाल्यानंतर अळी बाहेर येते आणि धान्य खाण्यास सुरुवात करते. त्यामुळे धान्य चांगले वाळवून साठवावे. Grain Storage

धान्य साठवणूक करताना घ्यायची काळजी

धान्य साठवण्यापुर्वी कडक उन्हात वाळवून घ्यावं. गोदामातील कीड नियंत्रणाकरिता धुरिजन्य कीटकनाशकांचा वापर करावा. उघड्या धान्यावर कीडनाशके फवारु नयेत.

गोदामात असलेली बीळे सिंमेंटने बुजवून घ्यावीत जेणेकरुन उंदीर गोदामात पोहोचू शकणार नाहीत.

धान्य साठवण्यासाठी नविन गोणपाट किंवा पोती वापरावीत. धान्य साठवण्यासाठी जुने पोत वापरत असाल तर पोते गरम पाण्यात १५ मिनीटे भिजवून नंतर सुकवून वापरावे.

पावसाळ्यात धान्य हवाबंद जागी ठेवावे. उन्हाळ्यात धान्य मोकळी हवा लागेल अशा ठिकाणी ठेवावं.धान्याची पोती एका लाकडी फळीवर जमिनीपासून उंचावर आणि भिंतीपासून दूर ठेवावीत.

धान्य साठवणूक करताना कडूनिंबाचा पाला, बियांची पावडर वापरु शकता.

धान्य साठवलेल्या ठिकाणी उंदीर येऊ नये यासाठी दरवाज्याखाली गॅल्व्हनाईज पत्रा बसवून घ्यावा. उंदीर तसंच पक्षांना प्रतिबंध करण्यासाठी खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसवाव्यात.