नेहरूनगर गुलाब पुष्प उद्यान येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका व उदयन शालिनी प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने बीज गोळे बनवणे कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी महानगरपालिकेचे उद्यान विभागाचे विभाग प्रमुख रविकिरण घोडके यांनी
विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक मार्गदर्शन केले. या प्रसंगी उद्यान अधीक्षक गोरख गोसावी, मंजुषा हिंगे, उदयन शालिनी फेलोशिप प्रोग्रॅम यांचे वरिष्ठ समन्वयक भाग्यश्री गुरसाळे आणि कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.
या कार्यशाळेत आंबा, फणस, जांभूळ, चिंच आशा विविध देशी वृक्षांच्या बियांपासून सीडबॉल बनवण्यात आले.