- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
सोलापूर : डाळींब, केळी, द्राक्ष बागांसाठी लाखोंचा खर्च करूनही पिकांवरील वेगवेगळ्या आजारांमुळे ऐनवेळी पीक हातून निसटते. पिकांना हमीभावदेखील समाधानकारक मिळत नाही. राबणूक कमी अन् खर्चही मोजकाच आणि हमखास उत्पन्न, त्यामुळे ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. राज्यातील ३१ जिल्ह्यांमध्ये उसाच्या क्षेत्रात सोलापूर जिल्हा अव्वल आहे.राज्यातील ऊस क्षेत्रात दिवसेंदिवस मोठी वाढ होऊ लागली आहे. मागील गाळप हंगामाने तर रेकॉर्ड ब्रेक केला. आतापर्यंतच्या साखर कारखानदारीच्या इतिहासात तब्बल ६० हजार कोटी रुपयांचा तो हंगाम झाला. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’च्या माध्यमातून तेवढी रक्कम मिळाली. कोणत्याही फवारणीशिवाय, रोगांशिवाय हे पिक येत असल्याने फळबागांच्या तुलनेत त्याचा खर्चही खूप कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊस लागवडीकडे वाढला आहे. राज्यातील…
वालवड (वालपापडी) चे बाजार भाव अंदाज सप्टेंबर ते डिसेंबर 2022 नमस्कार जय किसान शेतकरी मित्रांनो आज आपण वालवड ( वालपापडी) या पिकाचे सप्टेंबर ते डिसेंबर 2022 कालावधीत काय भाव रहाण्याची शक्यता आहे या विषयावर चर्चा करणार आहोत. वालवड हे पिकं वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते या मध्ये प्रकार आणि व्हरायटी पण वेगवेगळ्या पहायला मिळतात.आपण ज्या पिकाबद्दल माहिती घेणार आहोत ते वेलवर्गीय मध्ये मोडते यासाठी आपली लागवड ही दोन ओळींतील अंतर 5 फुट आणि 2 वेलीतील अंतर 1.5 फुट असेल तर आपणाला एकरी अपेक्षित उत्पादन काढता येईल. लागवडीपासून 65/75 दिवसांत वालवड चे पीक तोडणीस येते आणि साधारण पणे 3 महिन्यापर्यंत…
पोटॅशियम शोनाईट हे उत्पादन पोटॅशियम व मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांचा डबल सल्फेट सॉल्ट आहे. हे खत पाण्यात १००% विद्राव्य असल्याने जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापरता येते. यात २३% पोटॅश, १०% मॅग्नेशियम व १५% गंधक ही अन्नद्रव्ये आहेत. कोणत्याही पिकाच्या पक्वतेच्या काळात मॅग्नेशियम व पोटॅश या अन्नद्रव्यांची गरज मोठ्या प्रमाणावर लागते कारण पिष्टमय पदार्थ व स्टार्च यांच्या चयापचयाच्या क्रियेत अनुक्रमे मॅग्नेशियम व पोटॅश ही अन्नद्रव्ये भाग घेतात म्हणून त्याचा पुरवठा अपुरा असल्यास फळांची वाढ आणि क्वॉलिटी यांवर विपरित परिणाम दिसून येतात. पक्वतापूर्व स्थितीमध्ये शिफारशीनुसार पोटॅशियम शोनाईटचा जमिनीतून, ड्रीपमधून किंवा फवारणीतून वापर केल्यास फळे व भाजीपाला पिकांमध्ये साखरनिर्मिती व फळांची फुगवण यावर अपेक्षित…
विषाणूजन्य रोग येऊ न देण्यासाठी घेतलेली काळजीच कधीही बरी, याचा प्रत्यय आपल्याला मानवात कोरोना, पशुधनामध्ये लम्पी स्कीन आणि पिकांमध्ये केजी सीएमव्ही या रोगामुळे आला आहे. केळी आगार म्हणून ओळखल्या जाणान्या जळगाव जिल्ह्यात केळी ‘बागांवर कुकुंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) या विषाणूजन्य रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर जामनेर आणि नंदूरबार जिल्ह्यातील शहादा या तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी, प्रादुर्भाव केळीच्या बागा काढून टाकत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे केळी पिकाचे सातत्याने नुकसान होत असते. २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे केळीला मोठा फटका बसला. दराच्या बाबतीतही व्यापारी केळी उत्पादकांची नेहमी कोडी करीत असतात. या सर्व आपत्तीमधून सावरण्याचा प्रयत्न केळी…
बांबू हा एक गवताचा प्रकार असून सर्वात जलद गतीने वाढतो.महाराष्ट्रात बांबूच्या 121 जाती असून त्यापैकी बोरबेट,सोनचिवा,मानवेल, कळक, काटेरी,मानगा, चिवा, चिवारी, इ कोकणात आढळून येतात.बांबू पिक लागवड मध्ये पर्यावरण,आर्थिक उन्नती,व रोजगाराच्या भरपूर संधी तयार होत आहेत. ठिंबक सिंचन ओलित वर बांबूची लागवड करून 70 मे टन उत्पादन मिळत.विदर्भात प्रामुख्याने कंटग,माणवेल,व पिवळा बांबू ची लागवड आढळून येते.पूर्वीं बांबू वन वृक्ष कायद्यामध्ये अंतर्भूत होते परंतु अलीकडे बांबू चा समावेश गवत वर्ग पीक लागवडीत केल्याने च बांबू लागवड आता शेतात किंवा बांधावर करता येईल व तोडनि ला सुद्धा टी. पी लागणार नाही, त्यासंबंधी सरकारी बंधने काढली आहेत या संबंधी रिझोल्युशन बी बी एस 2017/सी…
The problem of Plenty – हरभरा ‘नाफेड’च्या वेबसाईटवर 2020 व 2021 मधे आधारभावाने (MSP) खरेदी केलेल्या हरभऱ्याचे विक्री टेंडर्स टप्प्याटप्प्याने जारी होत आहेत. आधारभावापेक्षा आठ ते दहा टक्क्यांनी कमी रेटने नाफेडद्वारे खूल्या बाजारात हरभरा विकला जातोय.देशात हरभऱ्याचे साठे आजवरच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. मागील दोन वर्ष मिळून एकट्या नाफेडकडे 32 लाख टनापर्यंत हरभरा साचला आहे. देशांतर्गत हरभरा मागणी जिथे 90-95 लाख टन आहे, आणि उत्पादन 120 ते 130 लाख टनाच्या दरम्यान पोचले आहे. हरभऱ्याचे अतिरिक्त उत्पादन व साठे ही शेतकऱ्यांपुढची नाही, तर सरकारपुढचीही समस्या आहे. देशातील हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र 95 लाख हेक्टर असताना गेल्या हंगामात 114 लाख हेक्टरवर पेरणी होती.…
तब्बल 37 वर्षानंतर खैरनार कुटुंबाच्या शेतात “लक्ष्मी” परतलीये.महालपाटणे (ता.देवळा) गावचे बाळकृष्ण खैरनारांनी 1985 साली कपाशीचे शेवटचे पीक घेतले होते. त्यांचे पुतणे दीपकने यंदा कपाशी लावलीये.नाशिकच्या कसमादे भागात कपाशीला लक्ष्मी म्हटले जायचे. कामोड्या नाव देखिल प्रचलित होते. दीपक यांनी सांगितले की, सर्व पिकांमध्ये यंदा फक्त कपाशीचे पीक जोमदार आहे. वाढत्या पाऊसमानात कपाशी पिकांत तणनियंत्रण व कीडनियंत्रण शक्य होतंय. तुलनेने मका, पावसाळी कांदा आणि नव्याने आलेल्या सोयाबीनमध्ये पाऊस वाढल्याने खूप समस्या आहेत. यंदा मी एकट्यानेच कपाशीचे पीक घेतले. पुढच्या वर्षी आमच्या गिरणाकाठच्या शिवारात कपाशी घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढेल. विदर्भ-मराठवाडा यासह दक्षिण भारतातील पाऊसमान कपाशीसाठी फारसे अऩुकूल नाही. रोगराई वाढतेय, एकरी उत्पादता घटतेय.…
घोटवडे गावातील रहिवासी कै.विजया कृष्णदास मेहता यांची नात व नामवंत CA श्री. सुरेश मेहता यांची कंन्या IAS संपदा मेहता यांची भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्या खाजगी सचिवपदी 5 वर्षांकरिता झालेल्या निवडी मुळे तालुक्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले असून त्यांचे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे.घोटवडे गाव व पंचक्रोशितील नागरिकांचा IAS संपदा मेहता यांचा जंगी “कौतुक सोहळा” करण्याचा मानस आहे.सीए. सौ. संपदा मेहता, IAS, यांचा अल्प परिचय:- जन्म पुणे दिनांक १६ जानेवारी, १९८२. अतिशय दैदिप्यमान शैक्षणिक कामगिरी. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण: – हुजूरपागा, पुणे -४११ ०३०. महाविद्यालयीन शिक्षण: – सर परशुराम भाऊ महाविद्यालय, पुणे -४११ ०३०. इयत्ता दहावी – पुणे विभागात…
कोल्हापूर : गेल्या वर्षीचा ऊस हंगाम जून महिन्यापर्यंत लाबल्याने यंदा सरकारने एक ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याबाबत नियोजन सुरू केले आहे. सध्या राज्यभर सुरू असणारा वादळी पाऊस सरकारच्या या प्रयत्नाला खीळ घालण्याची शक्यता आहे. विशेष करून ऊस पट्ट्यामध्ये सातत्याने जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याकडूनही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर एक ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचे आव्हान आहे. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यात दसरा ते दिवाळी या दरम्यानच ऊस हंगाम सुरू होईल, अशी शक्यता आहे. राज्यात यंदा १४ लाख ८८ हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस तोडणीसाठी उपलब्ध आहे. गेल्या वर्षी १४ लाख ८७ हजार हेक्टर क्षेत्रावरील उसाची तोडणी…
नमस्कार द्राक्षबागायतदार बंधुनो,द्राक्ष बागेत फळछाटणी पुर्व पानगळ करण्याचा काळ खुप महत्त्वाचा असतो. वेलिवरील नैसर्गिक पानगळ अवस्था लक्षात घेऊन पानगळ कधी करावी हे ठरविता येते. पानगळ ही साधारणतः फळ छाटणीच्या १५ दिवस अगोदर करावी. हा कालावधी बागेतील पानगळ कमी/अधिक अवस्था पाहून ठरवावा. बागेमधील नैसर्गिकरीत्या पानगळ ही साधारणतः ७० ते ८०% झाली असल्यास अशा बागेची छाटणी लवकर करुन घ्यावी. बागेमध्ये नैसर्गिक रित्या पानगळ झाली नसल्यास इथेफॉनची फवारणी घेऊन पानगळ करावी. द्राक्ष बागेतील फळ छाटणी करण्यापुर्वी द्राक्ष बागेतील ७० ते ८०% टक्के पानगळ होने खुप गरजेचे असते. नैसर्गिकरीत्या पानगळ होन्यासाठी बागेला पाण्याचा ताण देणे आवश्यक आहे. 👉 द्राक्ष बागेत पानगळ करण्याकरीता पाण्याचा ताण…
