- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
राज्यात मागच्या काही दिवसांपासून पाऊस होणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु अद्यापही मॉन्सून राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात दाखल न झाल्याने बहुतांश जिल्ह्यात उपसाबंदीचा निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला. यामुळे शेती पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. याचबरोबर कृषी विभागाने राज्यातील हवामान, उन्हाळी हंगामाची अंतिम पीक परिस्थिती आणि खरीप हंगामाच्या तयारीबाबत राज्य मंत्रिमंडळासमोर अहवाल सादर केला आहे. राज्य कृषी विभागाने सादर केलेल्या या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. विभागाच्या या साप्ताहिक अहवालानुसार, राज्यात ९ जूनपर्यंत केवळ ५.५ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. हा पाऊस सरासरीच्या ६२.३ मि.मी. इतका म्हणजेच ८.८ टक्के आहे. दरम्यान मागच्या दोन आठवड्यात राज्यातील…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 15/06/2023 नागपूर लोकल क्विंटल 465 4400 4941 4806 वाशीम – अनसींग पिवळा क्विंटल 300 4750 5000 4850 गंगाखेड पिवळा क्विंटल 17 4800 4900 4800 औराद शहाजानी पिवळा क्विंटल 79 4871 4985 4928 मुरुम पिवळा क्विंटल 40 4700 4901 4800 उमरगा पिवळा क्विंटल 1 4551 4600 4551 14/06/2023 येवला — क्विंटल 29 4000 4721 4675 लासलगाव — क्विंटल 439 3000 5016 4960 जळगाव — क्विंटल 91 4725 4725 4725 शहादा — क्विंटल 46 4726 4726 4726 बार्शी — क्विंटल 205 3500 4900…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 15/06/2023 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 410 6850 7150 7000 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 225 6850 7150 7000 14/06/2023 राळेगाव — क्विंटल 3140 6800 7180 7050 समुद्रपूर — क्विंटल 332 6500 7200 7000 वडवणी — क्विंटल 90 6390 7000 6590 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1340 7100 7250 7200 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 530 6800 7125 7050 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 1711 6500 7200 6900 मनवत लोकल क्विंटल 3950 5800 7145 7025 देउळगाव राजा लोकल क्विंटल 1500 6700 7150 7000 वरोरा-माढेली लोकल…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 15/06/2023 कोल्हापूर — क्विंटल 3082 500 1600 1000 चंद्रपूर – गंजवड — क्विंटल 1405 1500 2300 1800 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11284 700 1400 1050 खेड-चाकण — क्विंटल 100 700 1200 1000 सातारा — क्विंटल 245 1000 1300 1150 पुणे लोकल क्विंटल 9587 500 1300 900 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 15 600 1200 900 कामठी लोकल क्विंटल 1 1000 1400 1200 येवला उन्हाळी क्विंटल 8000 300 1051 750 लासलगाव उन्हाळी क्विंटल 20000 400 1302 800 लासलगाव – निफाड…
सध्या महाराष्ट्रातील (Maharashtra) कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात (Onion Price) मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मात्र, महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणामध्ये चांगला दर मिळत आहे. तेलंगणा सरकारच्या हमीभाव योजनेमुळे महाराष्ट्रातील कांद्याला तेलंगणात चांगला दर मिळत असल्याची प्रतिक्रिया तेलंगणाचे माजी आदीवासी मंत्री नागेश गोडाम यांनी दिली. तेलंगणा येथे महाराष्ट्रातील कांद्याला दुप्पट भाव दिला जात आहे. जो कांदा भाव नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर फेकण्याची वेळ महाराष्ट्रात आली, त्या कांद्याला तेलंगणा सरकार चांगला दर देत आहे. तेलंगणा सरकारच्या हमीभाव कायद्यामुळं हा भाव देऊ शकले असेही नागेश गोडाम म्हणाले. गोडाम हे वर्धा इथंआले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.…
देशातील गहू उत्पादन यंदा विक्रमी पातळीवर पोहोचल्याचा अंदाज केंद्र सरकारने जाहीर केला. पण तरीही भारतीय अन्न महामंडळाला (एफसीआय) केवळ २६२ लाख टनांची खरेदी करता आली. तर खुल्या बाजारात मागील महिनाभरात गव्हाच्या भावात ८ टक्क्यांची वाढ झाली. गहू काढणी हंगाम संपून काही महिनेच झाले आहेत. मात्र निवडणुकांच्या तोंडावर गव्हाचे भाव वाढल्यास सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने शेवटी गव्हावर स्टॉक लिमिट लावले. मागील आठवड्यात तूर आणि उडदावर स्टॉक लिमिट लावल्यानंतर गव्हावर स्टॉक लिमिट लावले आहे. गेल्या हंगामात देशातील गव्हाचे उत्पादन घटले होते. तर निर्यातही चांगली झाली होती. परिणामी, खुल्या बाजारात गव्हाचे तेजीत आले होते. सरकारने खुल्या बाजारात गव्हाची विक्री करून…
खरीप कांदा रोपवाटिका व्यवस्थापन खरीप कांदा रोपवाटिकेमध्ये पेरणीनंतर २० दिवसांनी खुरपणी करावी. खुरपणीनंतर दोन गुंठे (२०० वर्ग मीटर) क्षेत्रासाठी ८०० ग्रॅम नत्र द्यावे. पाणी देताना ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. प्रत्येक वाफ्यामध्ये ठिबक सिंचनासाठी इनलाइन ड्रीपर असणाऱ्या १६ मि.मी. व्यासाच्या लॅटरलचा वापर करावा. दोन ड्रीपरमधील अंतर ३० ते ५० सें.मी. असावे. त्यांची पाणी बाहेर टाकण्याची क्षमता ताशी ४ लिटर असावी. तुषार सिंचन पद्धतीसाठी दोन लॅटरलमध्ये ६ मीटर इतके अंतर ठेवून, ताशी १३५ लिटर पाणी फेकण्याची क्षमता असलेले नोझल वापरावेत. रोपवाटिकेतील कीड व रोग नियंत्रण फूलकिडे (थ्रीप्स) (फवारणी प्रति लिटर पाणी) फिप्रोनिल १ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस १ मि.लि. किंवा कार्बोसल्फान २ मि.लि. मर रोग…
उन्हाळ्यात पक्षांना पाण्याची मोठी गरज भासते यामध्ये प्रामुख्याने कोंबड्यांना पाणी आणि सकस आहाराची गरज न भागल्यास कोंबड्या दगावण्याची शक्यता असते. यासाठी उन्हाळ्यात कोंबड्यांच्या आहाराबाबत आणि व्यवस्थापनातबाबत पुरेशी काळजी न घेतल्यास दुष्परिणाम दिसून येतात. यावर नेमक्या उपाययोजना केल्यास कोंबड्या दगावणारही नाहीत आणि अंड्यांची साईजही मोठी होईल. उष्णतेमुळे कोंबड्यांच्या अंडी देण्याच्या आणि अंडी उबविण्याच्या क्षमतेत कमीपणा येतो. तसेच काही वेळा कोंबड्यांच्या अंड्यांचा आकार लहान होतो. अंड्यांच्या कवचाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची होते. यामुळे अंडी निर्मीतीच्या व्यवसायावर थेट परिणाम दिसून येतात. दरम्यान कोंबड्याना उष्णतेचा त्रास जाणवत असल्यास काही लक्षणे आढळून येतात. त्याच वेळी उपाययोजना केल्यास पुढे होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. उष्णतेची सुरुवातीची लक्षणे : कोंबड्यांना…
उन्हाळ्यात देशातील चिकनचे भाव वाढलेले दिसतात. उन्हामुळे उत्पादनावर परिणाम होत असतो. यामुळे दर वाढतात. पण यंदा दरात झालेली वाढ जास्त आहे. सध्या देशातील वेगवेगळ्या भागात चिकनची किरकोळ विक्री २८० ते २३० रुपये प्रतिकिलोने होत आहे. देशात वर्षाला ४० लाख टन चिकनचे उत्पादन होते. याचे मुल्य जवळपास १ हजार ८५० कोटी रुपये असते. देशाच्या एकूण मांस उत्पादनात चिकनाचा वाटा ५० टक्के एवढा आहे. उन्हाळ्यात तापमान जास्त असते. उष्णतेत अचानक चढ उतार होत असतात. त्यामुळे पिलांची मर जास्त होते. त्यामुळे शेतकरी उन्हाळ्यात नवा लाॅट घेत नाहीत. किंवा उत्पादन वाढविण्याचा विचार करत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात चिकनच्या दरात सुधारणा झालेली दिसते. बिझनेसलाईनने दिलेल्या वृत्तानुसार,…
वाशी कृषी उत्पन्न बाजारसमितीत लसूण, कांद्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. एप्रिलपासून आवक घटली असून भाव वधारले आहेत. बाजारात आधी लसूण प्रतिकिलो ९० ते १२० रुपयांनी मिळत होता. आता ११० ते १५० रुपयांवर गेला आहे. तसेच पुढील काळात लसूण २०० पार करेल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नवीन ओल्या लसणाची आवक होण्यास सुरुवात होते. त्यामुळे नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्यात येतात; मात्र यंदा लसूण लागवडीखालील क्षेत्र कमी असल्याने उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे लसूण महागले आहे. दरवाढीची प्रमुख कारणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये २०-२५ गाड्या आवक होती. एप्रिलपासून आवक कमी होत आहे. शुक्रवारी बाजारात अवघ्या १२ गाड्यांमधून २,५८३ गोणी लसूण…
