सरकारने पंतप्रधान पीकविमा या नावाने ही योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा केवळ एक रुपयांत उतरविता येणार आहे.

याबाबत राज्य सरकारने घोषणा केली आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची पुरेशी भरपाई मिळावी, या उद्देशाने आता शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पीक विमा उतरविता येणार आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामातील पिकापासून या पीकविमा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा अध्यादेश अद्याप कृषी विभागाला मिळू शकलेला नाही.

त्यामुळे या विमा योजनेच्या लाभासाठी आणखी काही काळ अध्यादेशाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा केवळ एक रुपयांत उतरविता येणार आहे.

असे असताना मात्र या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार, कोणकोणत्या पिकांसाठी या योजनेचा लाभ मिळू शकणार, विम्याचा हप्ता कोठे व कधीपासून भरता येणार, नैसर्गिक आपत्ती किंवा अवेळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्यास, त्या नुकसानीची माहिती किती दिवसात आणि कोणाकडे द्यावी लागणार, याबाबत अजून माहिती आलेली नाही.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुगृह अनुदान योजना आदी विविध विमा योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.