Author: Neha Sharma

आज राज्यात टोमॅटो ला १५ रु ते ७२ रुपयांच्या दरम्यान दर भेटला असून कोल्हापुरात दर सर्वाधिक राहिले आहेत कोल्हापुरात टोमॅटो ची १५४ क्विंटल आवक झाली असून १५०० ते ७२०० प्रति क्विंटल चा दर भेटला आहे. पुणे मार्केट मध्ये २००० ते ५००० रुपये प्रति क्विंटल चा दर भेटला आहे (२० ते ५० रुपये किलो) पुणे मार्केट मध्ये ९६६ क्विंटल टोमॅटो ची आवक झाली आहे राज्यातील टोमॅटो विक्री त अव्वल असणाऱ्या संगमनेर मार्केट मध्ये आज ३१०० क्विंटल टोमॅटोची आवक झाली असून २५०० ते ५२५० रुपयांचा दर भेटला आहे.  तर सरासरी दर ३८७५ रुपयांचा दर भेटला आहे इतर बाजार  समिती मधील बाजार  भाव…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/05/2022 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 37 10000 12700 11500 26/05/2022 सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 225 9600 13310 10500 25/05/2022 जामनेर हायब्रीड क्विंटल 23 10000 13000 12700 सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 231 9700 13405 13000 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 321 9000 13655 11060 शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 30/05/2022 लासलगाव — क्विंटल 493 4000 6592 6560 लासलगाव – विंचूर — क्विंटल 194 3000 6553 6300…

Read More

‘फोर्ब्ज’ने तिशीच्या आत वय असणाऱ्या आणि नवनवीन उद्योग व्यवसाय सुरू करणाऱ्या उद्यमशील व्यक्तिंची यादी जाहीर केली आहे. त्यात “बिजक” नामक शेतमाल खरेदी-विक्री प्लॅटफॉर्मचा को फाऊंडर निखील त्रिपाठी यांचा समावेश आहे. 2019 मध्ये, त्रिपाठी, गुरुग्राम स्थित B2B ऍग्रीटेक फर्म बिजकची सह-स्थापना केली. प्लॅटफॉर्ममुळे कृषी माल खरेदीदार आणि विक्रेत्यांना चांगल्या किमती, वाढलेले खेळते भांडवल आणि सुधारित लॉजिस्टिकचा फायदा होतो. खरेदीदार/विक्रेता रेटिंग प्रणालीद्वारे, ते व्यापारी, घाऊक विक्रेते आणि फूड प्रोसेसर यांना नवीन आणि विश्वासार्ह व्यापार भागीदार शोधण्याची परवानगी देण्यास मदत होत आहे, याशिवाय कृषीमूल्य साखळीला उत्तरदायित्व (responcibility)आणि पारदर्शकता प्रदान करत आहेत. बीजक च्या प्लॅटफॉर्म वर ट्रान्सपोर्ट फॅसिलीटी सहज आणि सोप्या पद्धतीने दिली जात…

Read More

भारतात एवोकॅडो शेती: लागवड पद्धती, वाण, उत्पन्न, नफा आणि बरेच काही त्याच्या उत्पत्तीपासून ते विविध प्रकारांपर्यंत, ह्या लेखात भारतातील एवोकॅडो लागवडीचे तपशीलवार माहिती देत आहोत. एवोकॅडो हे उष्णकटिबंधीय अमेरिकन फळ आहे. याचा उगम मेक्सिको आणि मध्य अमेरिकेत, विविध प्रकारच्या वन्य प्रजातींमधून झाला असे मानले जाते. एवोकॅडो हे सर्व फळांपैकी सर्वात पौष्टिक आहे आणि मानवी पोषणासाठी हे नवीन जगाचे सर्वात आवश्यक योगदान म्हणून ओळखले जाते. काही लोक फळांचा चवीचा आनंद घेतात, तर काहींना आवडत  नाही. यामध्ये प्रथिने (4% पर्यंत) आणि चरबी (30% पर्यंत) आहे , महत्वाची बाब म्हणजे यात कर्बोदक कमी आहेत. संपूर्ण युनायटेड स्टेट्समध्ये विविध ठिकाणी एवोकॅडोचे पीक घेतले जाते.…

Read More

जिवामृत हे खत नसून अनंत कोटी उपयुक्त सुक्ष्म जिवाणूंचे सर्वोत्तम विरजन आहे.तसेच सर्वोत्तम बुरशिनाशक सर्वोत्तम विषाणू नाशक तूरोधक व सर्वोत्तम संजिवक आहे. फक्त एक वेळ वापरून पिकांचं निरीक्षण करा. जिवामृत कसे तयार करावे? 200 ली. पाणी त्यात 10 की. देशी गाईचेच शेण (जर्सी चे अजिबात नाही)5 ते 10 ली. देशी गाईचेच गोमुत्र ( जर्सी प्राण्याचे अजिबात चालणार नाही )1 की. काळा गुळ ( केमिकल नसलेला)किंवा 4 ली.ऊसाचा रस किंवा 10 की.ऊसाचे तुकडे,किंवा 10 की.गोड ज्वारीचे तुकडे, किंवा 1 की.गोड फळाचा गर आणी1 किलो  बेसन व 1 मुठ बांधावरची जिवानु माती.हे सर्व बॅरेल मध्ये टाकून चांगले ढवळुन पोते झाकून ठेवावे,सकाळ – संध्याकाळ…

Read More

साग झाडाची लागवड दोन पद्धतीने करता येते. १)सागजडी लावून २)पिशवीत रोपांची लागवड करून सागजडी लावून लागवड करताना रोपवाटिकेतून रोपे काढून सागजडी तयार केल्यानंतर शक्‍यतो लगेच लागवड करावी. जडी तयार केल्यापासून ८ ते १० दिवसांतच लावावी. सागाची जडी लावताना अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीत जोवर ऊब आहे तोवरच लागवड करावी लागवड करताना प्रथम लागवड क्षेत्रात पहारीने जडीच्या उंचीची छिद्रे करावीत खोडाचा भाग जमिनीच्यावर ठेवून मुळांचा भाग जमिनीत लावावा. नंतर आजूबाजूची माती पक्की दाबावी सागजडीच्या तळाशी व आजूबाजूस पोकळी राहून पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी जातींची निवड  भारतीय साग, ऑस्ट्रेलियन साग (आकेशिया मॉंजियम) आफ्रिकन साग बर्मासाग आणि पांढरा साग (शिवण) अशा…

Read More

सहकारी साखर कारखाने गळीत हंगाम संपवताना त्यांनी किती लाख टन गळीत केले त्याची जाहिरात करत आहेत. दहा लाख टन, पंधरा लाख टन पासून तीस लाख टन गळीत एकच कारखान्याने केल्याची आकडेवारी समोर येत आहे. यावरून संचालक मंडळे नुसत्या भेळ भत्यावर खुश होऊन पोस्ट viral करीत आहेत. केवळ त्यानेच ना भागल्याने, चेअरमन ने कर्मचाऱ्यांना अन् त्यांच्या पोरासोराना देखील अश्या पोस्ट फिरवायला सांगितले की काय अशी शंका येते आहे. अर्थात, शेतातील परिस्थिती वेगळीच आहे. शेतातील ऊस कारखान्यात पोचवायला शेतकऱ्याला किती पैसे कुणाला द्यावे लागले हे जगजाहीर आहे. (कंसात सहकारी कारखाना हा शेतकऱ्यांच्या मालकीचा असतो असे वाचावे) दहा लाख टन ऊस गळीत झाला…

Read More

राज्यात 30,31 मे व 1,2,3,4 जून राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी असेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे . 25 मे ते 27 मे दरम्याण पूर्व विदर्भ व मराठवाडा मुंबई कोकनपट्टी तुरळक ठिकाणी पाउस पडेल . मान्सून चा पाऊस येण्यासाठी अद्याप 13 दिवस राहीले आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. राज्यात 30 ,31 मे व 1 जून 2,3,4, दरम्याण . मान्सून पूर्व पावसाचे जोरदार पाउस पडणार आहे हा पाउस मुंबई कोकनपट्टी, नाशिक इगतपुरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, पूणे, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी ,जालना, औरंगाबाद, बिड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, नागपूर, अकोला या जिल्ह्यातील ठिकठिकाणी पडेल. राज्यात काही…

Read More

सोयाबीनची पेरणी  ७५ ते १०० मिलीमिटर पुरेसा पाऊस झाल्यानंतर जमिनीमध्ये वापसा असताना १५ जुलै पर्यंतच पेरणी पूर्ण करावी. १५ जुलै नंतर पेरणी केल्यास उत्पादनात घट येते. जमिनीत चांगली ओल असल्यावरच पेरणी करावी. पेरणी करून पाणी दिल्यास बियाण्याची उगवण कमी होते. पेरणी करताना पट्टा पद्धत वापरावी. दोन ओळीतील अंतर ३० सेंमी ते ४५ सेंमी व दोन रोपातील अंतर ५ ते ८ सेंमी याप्रमाणे पेरणी करावी. (३० x ८ सेंमी) किंवा (४५ x ५ सेंमी) जेणेकरून रोपांची संख्या ४ ते ४.५ लाख एवढी राहील. पेरणी करताना बियाणे ४ सेमी. पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. तांबेरा प्रभावित भागामध्ये पाण्याची सोय आहे तेथे…

Read More

महाराष्‍ट्रात टोमॅटो लागवडी खा अंदाजे 29190 हेक्‍टर क्षेत्र आहे. नाशिक, पुणे, सातारा, अहमदनगर, नागपूर, सांगली हेक्‍टरी महाराष्‍ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्‍वाचे जिल्‍हे आहेत. तीनही म्‍हणजे खरीप, रब्‍बी उन्‍हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येत असल्‍यामुळे टोमॅटो हे महाराष्‍ट्रातील शेतक-यांचे प्रमुख फळपिक आहे. टोमॅटो मध्‍ये शीर संरक्षक अन्‍नघटक मोठया प्रमाणात उपलब्‍ध असल्‍यामुळे टोमॅटोचे आहारातील महत्‍व अनन्‍य साधारण आहे. टोमॅटो अ, ब आणि क जीवनसत्‍वे तसेच खनिजे चुना, लोह इत्‍यादी पोषक अन्‍नद्रव्‍येही टोमॅटो मध्‍ये पुरेशा प्रमाणात असतात. टोमॅटोची कच्‍ची अथवा लाल रसरशीत फळे भाजी किंवा कोशिंबीरीसाठी वापरली जातात. तसेच टोमॅटोच्‍या पिकलेल्‍या फळांपासून सुप, लोणचे, सॉस, केचप, जाम, ज्‍युस इत्‍यादी पदार्थ बनविता…

Read More