- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
देशातील बाजारात तुरीची आवक हळूहळू वाढत आहे. पण आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे तुरीच्या दरात तेजी आहे. मागील महिनाभरापासून आवक कमी असल्याने व्यापाऱ्यांना गरजेपुरती तूर मिळत नाही. सध्या अनेक बाजारात तुरीचा सरासरी भाव ८ हजार ५०० रुपयांच्या पुढे गेला. त्यामुळं ८ हजार रुपयांपेक्षा कमी दरात खरेदी केलेली तूर काही व्यापारी बाजारात विकून नफावसुली करताना दिसत आहेत. मागील आठवडाभरात ग्राहक बाजारात तुरीची विक्री वाढलेली दिसली. त्यामुळं तुरीच्या दरावर दारत क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांची तेजी मंदी सुरु आहे. पण तुरीच्या दरातील तेजी टिकून आहे. एक-दोन बाजारांमध्ये चांगल्या गुणवत्तेच्या तुरीला कमाल ९ हजारांचाही दर मिळाला. हिंगणघाट बाजारातील पावत्या सोशल माध्यमांमध्ये फिरत…
खानदेशात केळी दरात काहीशी नरमाई मागील सहा ते सात दिवसांपासून दिसत आहे. खोडवा किंवा पिलबाग केळीत काढणी बऱ्यापैकी होत आहे. सध्या केळीस कमाल २५०० तर किमान १७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. निर्यातीची किंवा दर्जेदार केळीची आवक कमी आहे. केळीची परदेशातील निर्यात अद्यापही प्रतिदिन चार कंटेनर, (एक कंटेनर २० टन क्षमता) अशीच आहे. जळगाव जिल्ह्यात दोन, धुळ्यात एक व नंदुरबारात एक कंटेनर निर्यातीच्या केळीसंबंधी उपलब्ध होत आहे. स्थानिक बाजारात केळीची मागणी कमी आहे. पण केळीची आवकही कमी असल्याने दरात मोठी घसरण किंवा दबाव नाही. परंतु केळीचे कमाल दर २६०० ते २८०० रुपयांवरून २५०० रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत. तर किमान दर…
कांदा लाऊन 70/75 दीवस झाले आहे कांदा फुगवण कशी करावी हे पुर्वी सांगितले आहे. आता काढणेचे आधी वेस्ट डीकाॅमपोजर ठीबक मधुन सोडावे , सरी,वाफे असेल तर पाईपमधून वहेनचुरीतुन एकरी दोनशे लिटर द्रावण दोन वेळा सोडावे. तसेच पिकांवर पंपातुन फवारणी करावी पांच लिटर द्रावण व दहा लिटर पाणी घ्यावे. वेस्ट डीकाॅमपोजर मधील जिवाणू मुळे जमिन भुसभूशीत होऊन कांदा लवकर उपटला जाईल. कांदा पात कापतांना एक इंच पात ठेऊन कापावी. जोड,टेगंळा कांदा बाजुला काढावा रोगाच्या साथीमुळे ज्यास्त मजुर लाऊन नये. कांदे सावली त वाळवावे जमिनीवर कडुनिंबचा पाला अंथरुन त्यावर कांदे पसरावे. जोड टेगंळा कांदा आधी विक्री करावा बाजारभाव पाहून थोडा थोडा कांदा…
सध्या उन्हाळा आला आहे. हळूहळू तापमान वाढेल. दिवसा कडक उन्हाचा आणि रात्री प्रचंड आर्द्रतेचा सामना करावा लागणार आहे. हवामानातील बदलाबरोबरच उन्हाळ्यात साप, विंचू, डास व इतर किटकांचा प्रादुर्भावही वाढतो. अशा परिस्थितीत मानव शक्य ती सर्व खबरदारी घेऊन स्वत:ला सुरक्षित ठेवतो, परंतु गरीब मुक्या प्राण्यांना या समस्यांना तोंड द्यावे लागते. सर्पदंशामुळे अनेक प्राण्यांचा मृत्यूही होतो. तुमच्याकडे पाळीव प्राणी असल्यास किंवा पशुपालन करत असल्यास. जर तुमच्या प्राण्याला विषारी साप चावला असेल तर हा लेख नक्की वाचा. प्राण्याला विषारी साप चावला असेल तर घाबरू नका, वेळीच योग्य ती पावले उचलून प्राण्याला वाचवू शकता. अशा स्थितीत प्राणी पाळणाऱ्याने आधी कोणत्या ठिकाणी साप चावला आहे. याचा शोध…
गेल्या सप्ताहात होळीनिमित्त शेतीमालाची आवक कमी झाली होती. मात्र ती आता पुन्हा पूर्ववत झाली आहे. कापसाची आवक वाढत्या पातळीवर स्थिर आहे. तूर, हरभरा व हळद यांची आवक वाढत आहे. मका (Maize) व सोयाबीन (Soybean) यांची आवक कमी होत आहे. कांद्याची आवक विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. या सप्ताहात कापूस, मका, हळद व सोयाबीन यांच्या किमती घसरल्या. तुरीच्या किमती वाढल्या, तर हरभरा स्थिर होता. टोमॅटोच्या किमती आता वाढू लागल्या आहेत. MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.७ टक्क्याने घसरून प्रति खंडी रु. ६२,१२० वर आले होते. याही सप्ताहात ते १.८ टक्क्याने घसरून रु. ६०,९८० वर आले आहेत. एप्रिल…
प्राण्यांची शिंगे त्यांच्यासाठी अनेक कार्ये करतात. प्राणी त्यांच्या शिंगांचा वापर लढण्यासाठी आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी करतात. पण बघितले तर त्यांच्या शिंगांचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की प्राण्यांची शिंगे कापण्याला शास्त्रज्ञांच्या भाषेत डी-हॉर्निंग म्हणतात. चला तर मग या लेखात त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया, ते का कापण्याची गरज आहे… मोठ्या आणि लांब शिंगे असलेल्या प्राण्यांना सर्वात धोकादायक आजार झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. शिंगाच्या पेशी प्राण्यांमध्ये अनावश्यकपणे वाढतात, जे प्राण्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. वास्तविक, अशा परिस्थितीत शिंगे लवकर मऊ होऊ लागतात आणि नंतर हळूहळू एका बाजूला लटकू लागतात. त्यामुळे प्राण्यांच्या डोक्यात खूप वेदना होतात आणि ही वेदना…
सध्या वादात अडकलेल्या वाळूसंबंधी राज्य सरकारने नवीन धोरण आखले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून अलीकडेच लोणी येथे झालेल्या राज्यस्तरीय महसूल परिषदेत हे धोरण तयार करण्यात आले आहे. याची घोषणा आज विधानसभेत केली जाणार असल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. ऑनलाइन नोंदणी आणि मागेल त्याला सरकारतर्फेच घरपोच वाळू पुरवठा करण्याचा या धोरणात समावेश असल्याचेही विखे पाटील म्हणाले. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर महसूलमंत्री पद मिळालेल्या विखे पाटील यांनी यासंबंधी नवे धोरण आखण्याचे ठरविले. त्यापूर्वीच्या सरकारमधील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात वाळू व्यावसायिकांना आणि त्यात अडकलेल्या सरकारी यंत्रणेला पाठीशी घालत असल्याचा आरोप विखे पाटील सतत करतात. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही यावरून थोरात…
जमीन मोजणीचे नियम आहेत. कायदे आहेत. तरी लाचखोर, भ्रष्ट मानसिकतेचे काय करणार, हा प्रश्न येतोच. आधी शेतीचेच प्रश्न काही कमी नाहीत. त्यात वरून जमीन मोजणीच्या नावाखाली आपणच आपले किती हाल करून घ्यायचे? आणि आपण नुसताच त्रागा आणि चिडचीडही किती करायची हा ही मुद्दा आहेच. नुसत्या चिडचिडीने ही यंत्रणा तर बदलणार नाही तर, मग किमान आपण काही बदल करावेत का? जेणेकरून आपण या यंत्रणेच्या हातचे बाहुले होत राहणार नाही. इथे एका माकडाची आणि दोन मांजरींची एक गोष्ट सहज आठवते. दोन मांजरींना लोण्याचा गोळा सापडला. मात्र तो आपापसांत वाटायचा कसा यावरून त्यांच्यात वाद जुंपले. त्यांच्यात एकमतच होईना. कुणीच माघार घेईना. मग त्या…
पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव संपलेला असून पश्चिमेकडील भागावर हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर १००८ हेप्टापास्कल इतका अधिकचा हवेचा दाब राहण्यामुळे पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांना प्रतिबंध झाला आहे. त्यामुळे पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव कमी होऊन पावसात उघडीत राहण्याची शक्यता आहे. यापुढील काळात कमाल व किमान तापमानात वाढ होत जाईल. प्रखर सूर्यप्रकाश आणि उष्णता जाणवेल. दुपारी वेळी उष्णतेचे प्रमाण अधिक राहील. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी होईल. बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत जाईल. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ अंश सेल्सिअस, हिंदी महासागर व बंगालचे उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९.३० अंश सेल्सिअस तर प्रशांत महासागराचे…
शेतमाल : कलिंगड दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 18/03/2023 श्रीरामपूर — क्विंटल 37 800 1200 1000 पुणे-मोशी लोकल क्विंटल 80 6000 7000 6500 17/03/2023 पुणे-मांजरी — क्विंटल 15 800 800 800 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 6785 700 1300 1000 श्रीरामपूर — क्विंटल 33 800 1000 900 सोलापूर लोकल क्विंटल 170 500 2700 1500 नाशिक लोकल क्विंटल 320 500 1000 700 सांगली -फळे भाजीपाला लोकल क्विंटल 300 500 1400 900 पुणे लोकल क्विंटल 461 500 800 700 पुणे-मोशी लोकल क्विंटल 235 500 800 650 16/03/2023 पुणे-मांजरी — क्विंटल…
