Author: Neha Sharma

 उन्हाची तीव्रता वाढण्यासोबतच लिंबूला देखील मागणी वाढली आहे. त्याच्याच परिणामी कळमना बाजार समिती  फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अवघ्या २५०० ते २७०० रुपये क्‍विंटल याप्रमाणे व्यवहार होणाऱ्या लिंबाचे दर  मार्च महिन्यात १० ते ११ हजार रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. यापुढील काळात तापमानात वाढ झाल्यास या दरात आणखी सुधारणा होईल, अशी शक्‍यता व्यापाऱ्यांकडून वर्तविली जात आहे. उन्हाळ्यात लिंबाला मागणी वाढते. त्याच्याच परिणामी उन्हाळा वगळता इतर कालावधीत लिंबाचे दर दबावात राहतात, असा दरवर्षीचा अनुभव आहे. आताही तीच परिस्थिती असून, कळमना बाजार समितीत लिंबाच्या दराने मोठी झेप घेतली आहे. १ फेब्रुवारी रोजी लिंबाची १०० क्‍विंटल आवक आणि दर २५०० ते २७०० रुपये असा होता. त्यानंतर ३००० ते…

Read More

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावलीये. या अवकाळी पावसामुळं शेतकरी मात्र चांगलेच धास्तावले आहेत. कारण, अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. तर, काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. 20 मार्चपर्यंत म्हणजे आणखी पुढचे तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान राज्यात मराठवाडा, कोकण, मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात गारपिटासह पावसाची शक्यता आहे. याचबरोबर अन्य काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड, लातूर. या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर…

Read More

बहुतेक ठिकाणी खरीप, रब्बी हंगामात हिरवा चारा उपलब्ध होतो. त्यामुळे जानेवारीपासून पुढे तो जूनपर्यंत जनावरांना हिरवा चारा नसतो. हिरवी वैरण सुकवून ठेवली किंवा मुरघास तयार करून तो चारा टंचाई असताना वापरू शकतो. हिरवा चारा योग्य वेळी व योग्य प्रकारे वाळवून सुकी वैरण तयार करता येते. हिरवा चारा सुकवून त्यातील पोषक द्रव्ये, खनिजे व जीवनसत्वे टिकविता येतात. उत्तम प्रतीची सुकी वैरण बनविण्याचे यश हे चारा कापण्याची वेळ, त्याची वाढ, ऋतुमान व चारा वाळविण्याची इत्यादी गोष्टीवर अवलंबून असते. चारा फुलोऱ्यात असताना कापल्यास त्यातील पोषक द्रवे जास्तीत जास्त प्रमाणात टिकतात. गवतास बुरशी नसावी, खराब वास नसावा. सर्वसाधारणपणे चाऱ्यामध्ये ६५.८५ टक्के पाण्याचे प्रमाण असते.…

Read More

जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण सल्याने बेदाणा निर्मितीस अडचणी येऊ लागल्या आहेत. परिणामी बेदाणा तयार होण्यास विलंब लागत आहे. यामुळे बेदाणा उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील नागज परिसरात बेदाणा निर्मितीची शेड उभी आहेत. गेल्या महिन्यापासून बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू आहे. पोषक वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा तयार होत आहे. बेदाणा हंगाम मध्यावर आला आहे. सुमारे तीन ते चार हजारांहून अधिक बेदाणा शेडवर बेदाणा तयार करण्याची लगबग सुरू आहे. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि बहुतेक भागात हलका पाऊस झाला आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे…

Read More

बाजारात सध्या व्यापाऱ्यांना पुरेशी तूर मिळत नाही. एरवी या दिवसांत व्यापाऱ्यांना गरजेपेक्षा जास्त तूर उपलब्ध असते. पण सध्या महाराष्ट्रातील महत्वाच्या लातूर, सोलापूर, जालना आणि अकोला तसेच कर्नाटकातील प्रमुख बाजारांतहीतुरीची आवकखूपच कमी आहे. व्यापाऱ्यांना कमी तूर मिळत असल्याने तूर डाळीचे दरही वाढत आहेत. सध्या महाराष्ट्रात ११५ ते १२० रुपये किलोने तूर डाळ मिळत आहे. तर इतर राज्यांतील दरपातळी १२० ते १३० रुपयांच्या दरम्यान आहे. त्यामुळे तुरीलाही आधार मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदा देशातील तूर उत्पादन घटले. मागील हंगामात हमीभावापेक्षा कमी दर मिळल्याने शेतकऱ्यांनी तुरीची लागवड कमी केली. त्यातच पावसामुळे उत्पादनात घट आली. त्यामुळे यंदा तूर मिळत नसल्याचं व्यापारी आणि उद्योगाचे प्रतिनिधी…

Read More

देशातील कापूस उत्पादन यंदा उद्दीष्टापेक्षा खूपच कमी राहिल्याचे आता स्पष्ट झाले. काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयने आता देशातील कापूस उत्पादन ३१३ लाख गाठींपर्यंत घटल्याचे स्पष्ट केले. तर कापसाचा वापर आणि निर्यात कायम राहील, असं म्हटलं. त्यामुळे सध्या दबावात असलेल्या कापूस बाजाराला आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली. देशातील कापूस उत्पादनात यंदाही मोठी घट झाली. याआधी अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीएने देशातील उत्पादन घटल्याचे स्पष्ट केले होते. युएसडीएने भारतातील उत्पादन यंदा ३१३ लाख गाठींवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला होता. आता सीएआयनेही उत्पादन ३१३ लाख गाठींपर्यंत घटल्याचे सांगितले. गेल्या हंगामात देशात ३०७ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते. सीएआयने यापुर्वी देशातील…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/03/2023 कोल्हापूर — क्विंटल 5278 400 1200 800 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 9420 800 1300 1050 खेड-चाकण — क्विंटल 600 800 1300 1100 मंगळवेढा — क्विंटल 223 200 1010 860 राहता — क्विंटल 2984 200 1200 750 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 8732 500 1510 1000 सोलापूर लाल क्विंटल 58666 100 1350 500 येवला लाल क्विंटल 8000 200 902 650 येवला -आंदरसूल लाल क्विंटल 5000 200 961 700 लासलगाव – निफाड लाल क्विंटल 1804 351 900 780 लासलगाव -…

Read More

शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 17/03/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 100 3000 5136 5000 औरंगाबाद — क्विंटल 7 4500 4800 4650 कारंजा — क्विंटल 1800 4500 5150 4965 तुळजापूर — क्विंटल 60 5000 5100 5050 राहता — क्विंटल 35 4940 5060 5000 सोलापूर लोकल क्विंटल 96 4965 5115 5065 नागपूर लोकल क्विंटल 292 4500 5100 4950 हिंगोली लोकल क्विंटल 300 4835 5140 4987 अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 13 3561 4881 4226 लासलगाव – निफाड पांढरा क्विंटल 90 4551 5211 5125 जालना पिवळा क्विंटल 1449…

Read More

खानदेशात पांढऱ्या प्रकारातील मोठ्या काबुली हरभऱ्यास नऊ ते साडेनऊ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर  आहे. तसेच लहान प्रकारातील पांढऱ्या काबुली हरभऱ्यास कमाल साडेसहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. मोठ्या पांढऱ्या काबुली हरभऱ्यास खानदेशात डॉलर किंवा मेक्सिको असेही म्हटले जाते. त्यातील लहान आकाराच्या पांढऱ्या काबुलीस व्ही टू म्हटले जाते. या दोन्ही हरभऱ्यांचे दर यंदा बऱ्यापैकी आहेत. मोठ्या काबुली हरभऱ्याची पेरणी खानदेशात जळगावमधील रावेर, चोपडा, यावल, जामनेर, धुळ्यातील शिरपूर व नंदुरबारमधील शहादा भागात केली जाते. केळीसाठी बेवड आणि कापणी पूर्ण झालेल्या केळी पिकात त्याची लागवड डिसेंबरमध्ये केली जाते. हा हरभरा अलीकडेच पक्व झाला आहे. काही भागांत त्याची मळणी झाली आहे. तर…

Read More

चिंच हे फळाचे झाड आहे हे सर्वांनाच माहीत आहे. भारतात आढळणाऱ्या विशेष फळझाडांपैकी एक, चिंचेचा वापर महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील प्रादेशिक पाककृतींमध्ये चवीनुसार मसाला म्हणून केला जातो. रसम, सांभार, वात कुळंबू, पुलिओगरे इत्यादी बनवताना चिंचेचा विशेष वापर केला जातो आणि कोणतीही भारतीय चाट चिंचेच्या चटणीशिवाय अपूर्ण असते. अगदी चिंचेच्या फुलांचा वापर स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. त्यामुळे चिंचेची लागवडही कमी नफा देणारी आहे. चिंचेची लागवड खाद्यपदार्थात चव आणणारे फळ म्हणून केली जाते. त्याची लागवड विशेष फळांसाठी केली जाते, जी बहुतेक पावसाच्या प्रदेशात उगवली जाते. चिंच ही गोड आणि आम्लयुक्त आहे आणि त्याच्या लगदामध्ये रेचक गुणधर्म आहेत. भारतात कोमल पाने, फुले…

Read More